नाच, गाणी, मर्दानी खेळ अशा उत्साही वातावरणात पुणेकरांनी रविवारी वाहनमुक्त रस्त्याचा अनुभव घेतला. आकर्षक पद्धतीने रंगविलेले रस्ते, रस्त्यावर विनाअडथळा फिरणारे पादचारी, रस्त्यावर खेळणारी लहान मुले, सारंगीचे मधूर सूर, असे उत्साही वातावरणाचा अनुभव पादचारी दिनानिमित्त पादचाऱ्यांनी लक्ष्मी रस्त्यावर घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>>पुणे: शहरातील पाच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

पादचाऱ्यांना अडळामुक्त मार्गक्रमण करता यावे, या उद्देशाने महापालिकेच्या वतीने रविवारी लक्ष्मी रस्त्यासह २१ रस्त्यांवर पादचारी दिन उपक्रमाचे रविवारी आयोजन करण्यात आले. लक्ष्मी रस्त्यावरील उंबऱ्या गणपती चौक ते गरुड गणपती चौक सकाळी अकरा ते दुपारी चार या कालावधीत वाहनमुक्त ठेवण्यात आला. या ठिकाणी वाॅकिंग प्लाझासह स्थानिक गटांच्या सहकार्याने लक्ष्मी रस्त्यावर मनोरंजक आणि संवादात्मक उपक्रम आयोजित करण्यात आले. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते या उपक्रमाचे सकाळी उद्‍घाटन झाले.

एरवी लक्ष्मी रस्त्यावर नेहमी वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांची गर्दी असेच चित्र दिसून येते. पादचारी दिनानिमित्त रविवार त्याला अपवाद ठरला. मोकळे वातावरणाचा पादचाऱ्यांनी अनुभव घेतला. पादचारी दिनानिमित्त रस्त्याला आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली होती. शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिके, सारंगीचे सूर, बॅण्डच्या तालावर थरकणारी तरूणाई असे वातावरण या रस्त्यावर दिसून आले. विना अडथळा चालण्याचा अनुभवही पादचाऱ्यांनी यानिमित्ताने घेतला. उंबऱ्या गणपती चौक ते गरुड गणपती चौक या दरम्यान पादचारी दिन साजरा करण्यात आल्याने लक्ष्मी रस्त्यावरील वाहतूक बंद आज सकाळपासून ठेवण्यात आली होती.

हेही वाचा >>>पुणे: वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाच्या आमिषाने ४४ लाखांची फसवणूक

पादचारी दिनानिमित्त वाहतूक नियमांबाबतही जनजागृती करण्यात आली. प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजनांचा संदेशही यानिमित्ताने देणअयात आला. लहान मुलांना वाहतुकीच्या नियमांची माहिती देण्यात आली.पादचारी दिन साजरा करणारी पुणे ही देशातील पहिली आणि एकमेव महापालिका आहे. गेल्या वर्षी लक्ष्मी रस्ता अर्धा दिवस वाहनमुक्त करून पादचारी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच पाषाण-सूस रस्ता, औंध ट्रॅफिक पार्क येथे पादचारी अनुकूल प्रकल्प सुरू करण्यात आले होते. यंदा या उपक्रमाची व्याप्ती पथ विभागाकडून वाढविण्यात आली.

लक्ष्मी रस्ता (उंबऱ्या गणपती ते गरुड गणपती), लाल बहादूर शास्त्री रस्ता, बिबवेवाडी रस्ता (रम्यनगरी ते पुष्पमंगल कार्यालय), सहकारनगर रस्ता (गजानन महाराज मठ ते पंचमी हॉटेल), वानवडी (जगताप चौक ते जांभूळकर चौक), लुल्लानगर ते गंगाधाम चौक, हडपसर-महंमदवाडी रस्ता (रहेजा सर्कल ते विबग्योर स्कूल), सासवड रस्ता (गाडीतळ ते गोंधळेनगर), जंगली महाराज रस्ता, पाषाण-सूस रस्ता, मयूर कॉलनी, सिटी प्राइड थिएटर कोथरूड, कर्वे रस्ता (शेलारमामा चौक ते सावरकर स्मारक, पौड फाटा ते डहाणूकर कॉलनी), खराडी दक्षिण मुख्य रस्ता, ५०९ चौक ते विश्रांतवाडी आणि बॉम्बे सॅपर्स ते विश्रांतवाडी या रस्त्यांवर पादचारी दिन उपक्रम राबविण्यात आला.