पुणे :कारागृहातुन सुटका होताच वाहन चोरीचे गुन्हे करणाऱ्या चोरट्यांना कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून दोन मोटारी, पाच दुचाकी असा दहा लाख ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अभिषेक शरद पवार (वय ३६, रा. गुरुवार पेठ), सुजीत दत्तात्रय कुंभार (वय ३६ रा. कोंढणपूर, खेड शिवापुर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अभिषेक पवार आणि सुजीत कुंभार यांची येरवडा कारागृहात ओळख झाली होती. जानेवारी महिन्यात जामीन मिळवून कुंभार कारागृहातून बाहेर पडला. पवार २ सप्टेंबर रोजी जामीन मिळवून कारागृहात बाहेर आला. पवारचा जामीन झाल्यानंतर तो कारागृहातून घरी गेला नाही. त्याने कोरेगाव पार्क भागातून एक दुचाकी चोरली. त्याने कुंभारशी संपर्क साधला. पवारने चोरलेली दुचाकी येरवडा कारागृहासमोर असलेल्या मोकळ्या जागेत लावली. कारागृहाच्या मोकळ्या जागेत एका पोलीस कर्मचाऱ्याने दुचाकी लावली होती. पोलीस कर्मचाऱ्याची दुचाकी चोरून पवार पसार झाला.

pune two wheeler theft marathi news
पुणे :सिंहगड रस्ता भागात दुचाकी चोरट्यांना पकडले, पाच दुचाकींसह लॅपटॉप जप्त
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Police detained three Bangladeshis living illegally in Bhiwandi for 15 years
भिवंडीतून तीन बांगलादेशींना ताब्यात, बनावट आधारकार्डासह शिधापत्रिका, पॅनकार्ड जप्त
Pune, Crime, Cop-24 , Police Patrol,
पुणे : रस्त्यांवरील गंभीर गुन्हे रोखण्यासाठी ‘कॉप – २४’, पोलिसांकडून आता अहोरात्र गस्त; ७२६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती
debt collectors false case news in marathi
जबरी चोरीचा बनाव करणाऱ्या कर्मचाऱ्याला बेड्या
minor detained for stealing vehicles for fun 5 two wheelers two rickshaws seized
मौजमजेसाठी वाहन चोरी करणारा अल्पवयीन ताब्यात; पाच दुचाकी, दोन रिक्षा जप्त
youth attacked over parking dispute in pune
पार्किंगच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण; तरुण गंभीर जखमी, बालेवाडीतील हायस्ट्रीट परिसरातील घटना
pune crime news
पुणे : भांडारकर रस्त्यावरील बंगल्यात घरफोडी करणारा गजाआड

हेही वाचा >>>पिंपरी-चिंचवड: वाहन तोडफोडे सत्र सुरूच; १३ ते १४ वाहनांची कोयत्याने तोडफोड

पोलिसांनी तपास करून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून पाच दुचाकी आणि दोन मोटारी जप्त करण्यात आल्या. पोलीस उपायुक्त स्मार्तन पाटील, सहायक आयुक्त दीपक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला, पोलिस निरीक्षक चेतन मोरे, उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, शांतमल कोळ्ळुर, विजय सातव, रमजान शेख, मयुर शिंदे, प्रविन पडवळ, संदीप जडर, राहुल वेताळ, राहुल मोकाशी यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा >>>‘मसाप’च्या वार्षिक सभेत गोंधळ, सभासदाने समाजमाध्यमात बदनामी केल्यावरून वादंग, संबंधिताचे सभासदत्व रद्द

पोलिसांना कसे सापडले

विधानभवनात मंत्र्याला भेटण्यासाठी आलेल्या एकाने मोटार लावली होती. पवार आणि कुंभारने त्यांना गाठले. तुम्ही चुकीच्या पद्धतीने मोटार लावली आहे.तुमच्या मोटारीमुळे अन्य वाहनचालकांना वाहने लावण्यास अडचण येत असल्याची बतावणी केली. मोटार नीट लावतो, असे सांगून दोघांनी मोटारचालकाकडून चावी घेतली. मोटार घेऊन दोघे जण पसार झाले. पुणे स्टेशन परिसरातून प्रवासी घेऊन दोघे जण मुंबईला गेले. दरम्यान, मोटार टोलनाक्यावरुन पुढे गेल्यानंतर मोटारमालकाच्या मोबाइल क्रमांकावर संदेश आला. त्याने पोलिसांकडे तक्रार दिली. खालापूर टोल नाक्याजवळ सापळ लावून पोलिसांनी पवार आणि कुंभार यांना पकडले.

Story img Loader