पिंपरी-चिंचवडमधील निगडी, बौद्ध नगर झोपडपट्टी परिसरात अज्ञाताने चार ते पाच चारचाकी गाड्यांच्या काचा फोडल्या. ही घटना मध्यरात्री दीडच्या सुरास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडीमधील बौद्ध नगर येथे रस्त्यावर उभ्या असणाऱ्या तब्बल ५ चारचाकी गाड्यांच्या काचा आज्ञाताने दगड मारुन फोडल्या. यात गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दारूच्या नशेत अज्ञात व्यक्तीने हा प्रताप केला असावा, असा प्राथमिक अंदाज निगडी पोलिसांनी वर्तवला आहे. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
यापूर्वी पिंपळे निलख या परिसरात काही समाज कंटकांनी कोयत्याने आणि लाकडी दांडक्याने १३ गाड्यांची तोडफोड केली होती. यावेळी चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सांगवी, पिंपळे गुरव, नेहरू नगर, साने चौक, निगडी या ठिकाणी देखील वाहनांच्या तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत.
First published on: 29-08-2017 at 15:06 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vehicles breakout incident in pimpri chinchwad