Pune Porsche Car Accident: कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी आरोपींच्या जामीन अर्जावर न्यायालय मंगळवारी (२० ऑगस्ट) निकाल देणार आहे. आरोपींच्या जामीन अर्जावर सरकार पक्ष आणि बचाव पक्षाने युक्तिवाद पूर्ण केला आहे.

कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाचे बांधकाम व्यावसायिक वडील विशाल सुरेंद्र अगरवाल, आई शिवानी, ससून रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागाचा प्रमुख डाॅ. अजय तावरे, डाॅ. श्रीहरी हाळनोर, अश्फाक मकानदार, अमर गायकवाड यांनी जामीन मिळवण्यासाठी न्यायालायत अर्ज केला होता. अगरवाल, डाॅ. तावरे, डाॅ. हाळनोर, मकानदार, गायकवाड येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या जामीन अर्जास विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी युक्तिवादात विरोध केला. बचाव पक्षाचे वकील ॲड. हर्षद निंबाळकर, ॲड. सुधीर शहा, ॲड. ऋषीकेश गानू, ॲड. प्रशांत पाटील, ॲड. प्रसाद कुलकर्णी, ॲड. शिवम निंबाळकर यांनी बाजू मांडली.

Drunk driver hits police constable incident in Kalyaninagar area
मद्यपी वाहनचालकाकडून पोलीस शिपायाला धक्काबुक्की, कल्याणीनगर भागातील घटना
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Mayni Medical College , Financial Misappropriation Mayni Medical College,
मायणी वैद्यकीय महाविद्यालय आर्थिक गैरव्यवहार प्रकरण : दीपक देशमुख यांची अटक बेकायदा ठरवून जामिनावर सुटकेचे आदेश
loksatta editorial on fake court set up in ahmedabad zws
अग्रलेख : भामटे आणि तोतये…
Action taken against constable who asked for bribe to help accused
आरोपीला मदत करण्यासाठी लाच मागणाऱ्या हवालदारावर कारवाई
court denied prearrest bail to thirteen accused in the Sassoon Hospital embezzlement case
ससूनमध्ये चार कोटींचा घोटाळा, तेरा आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला
Pune Porsche accident, minor driver friend,
पुणे पोर्शे अपघात : अल्पवयीन चालकाच्या मित्राच्या वडिलांनाही अटकपूर्व जामीन नाही
chandrakant handore
बेदरकारपणे गाडी चालवून दुचाकीस्वाराला धडक दिल्याचे प्रकरण : काँग्रेस नेते चंद्रकांत हंडोरे यांच्या मुलाला उच्च न्यायालयाकडून दिलासा

हेही वाचा : Water Supply Shutdown in Pune : शहराचा पाणीपुरवठा होणार बंद, काय आहे कारण?

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपींनी पुराव्यांशी छेडछाड केली. त्यांनी केलेला गुन्हा गंभीर आहे. पुराव्यामध्ये छेडछाड करून आरोपींनी नवीन पुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी न्याययंत्रणेशी खेळ केला, असा युक्तिवाद करून ॲड. हिरे यांनी आरोपींच्या जामीन अर्जास विरोध केला होता.

हेही वाचा : बारामतीमधून निवडणूक लढविण्यात ‘रस’ नसलेल्या अजित पवारांना शिरूमधून निमंत्रण !

अपघात प्रकरणातील मोटार ताब्यात देण्यासाठी अर्ज

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील महागडी मोटार ताब्यात देण्यात यावी, असा अर्ज अगरवाल यांनी बाल न्याय मंडळात (जेजीबी) केला आहे. या अर्जावर पोलिसांनी त्यांचे म्हणणे (से) मांडावे, असे आदेश न्यायालयाने दिले होते. अगरवाल यांच्या अर्जावर न्यायालय २८ ऑगस्ट रोजी निर्णय देणार आहे.