Heavy Rain Alert Pune : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिमुसळधार पाऊस पडत आहे. धरणांच्या परिसरात बुधवारी रात्रीपासून गुरुवारी सकाळपर्यंत यंदाच्या हंगामातील विक्रमी पाऊस झाला आहे. सध्या धरणांमध्ये २० अब्ज घनफूट (टीएमसी) ६९.५३ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांची पुढील वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. गेल्या सात दिवसांपासून या चारही धरणांच्या परिसरात दमदार पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे. बुधवारी  पहाटे साडेतीन वाजता खडकवासला हे धरण १०० टक्के भरल्याने या धरणातून मोठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.  या पार्श्वभूमीवर नदीपात्रालगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे. 

हे ही वाचा… पुणे शहर, जिल्ह्यात पावसाचा धुमाकुळ… लवासामध्ये तब्बल ४५३ मिलीमीटर!

बुधवारी रात्रीपासून गुरुवारी सकाळपर्यंत झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये

टेमघर २१०
वरसगाव १८६
पानशेत १८३
खडकवासला ११८

हे ही वाचा… पुणेकरांनो, महत्त्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडू नका, पालकमंत्री अजित पवार यांचे आवाहन

धरणांमधील पाणीसाठा टीएमसी, कंसात टक्क्यात

टेमघर २.१२ (५७.२७)
वरसगाव ८.०४ (६२.७४)
पानशेत ८.१३ (७६.३१)
खडकवासला १.९७ (१००)
एकूण २०.२७ (६९.५३)