पुणे : यंदाच्या पावसाळ्यात दोन जुलैपर्यंत राज्यातील प्रमुख धरणांमधील एकूण पाणीसाठा ३१२.४३ टीएमसी म्हणजेच २१.८४ टक्के इतकाच आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अमरावती, विदर्भात तुलनेने जास्त, तर पुणे आणि औरंगाबाद विभागांत सर्वांत कमी पाणीसाठा आहे.

जलसंपदा विभागाचे निवृत्त अभियंता हरिश्चंद्र चकोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील प्रमुख धरणांची पाणी साठवण क्षमता सुमारे १४३०.६३ टीएमसी आहे. त्यापैकी दोन जुलैअखेर २१.८४ टक्के म्हणजे ३१२.४३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. विभागनिहाय विचार करता, नागपूर विभागातील धरणांची पाणी साठवण क्षमता सुमारे १६२.७० टीएमसी आहे. क्षमतेच्या ३५.३६ टक्के म्हणजे सुमारे ५७.५३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

Maharashtra temperature rise news in marathi
राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या, पुढील २४ तासात असे असेल तापमान
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
ramabai Ambedkar hoarding vandalized
माता रमाई आंबेडकर यांच्या फलकाचा अवमान; कोपरगाव शहर बंद, शहरात तणाव, मोठा जमाव रस्त्यावर
nashik jaljeevan mission aims to provide 55 liters of clean water daily
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव जिल्ह्यातच ‘जलजीवन मिशन’ संकटात, चार वर्षात केवळ २९४ योजना पूर्ण
592 crores assistance to those affected by natural disasters
नैसर्गिक आपत्ती बाधितांना ५९२ कोटींची मदत, राज्यातील ५.४० लाख शेतकऱ्यांना दिलासा
nashik water news marathi
नाशिक जिल्ह्यात ३५७ गावांत वैयक्तिक विहिरी, विंधनविहिरींवर बंदी; १५ पाणलोट क्षेत्रात भूजलाचा बेसुमार उपसा
Ambuja Cements Maratha Limestone mine in Lakhmapur Korpana taluka will cause severe pollution affecting nearby villages
चंद्रपूर : अंबुजा सिमेंटच्या लाईमस्टोन खाणीमुळे प्रदूषणात वाढ; दहा ते पंधरा गावांना…
pune water bill marathi news
पुणे : पुरवठ्या आधीच समाविष्ट गावांच्या पाणीपट्टीत वाढ ?

हेही वाचा : राज्यातील द्राक्षांची जगाला गोडी, ५० देशांना निर्यात

अमरावती विभागातील धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता १३६.७५ टीएमसी असून, ३७.८० टक्के म्हणजे ५१.६९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. मराठवाडा विभागातील धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता सुमारे २५६.४५ टीएमसी इतकी असून, ९.६२ टक्के म्हणजे २४.६७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. नाशिक विभागातील धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता २०९.६१ टीएमसी असून, धरणांत २२.२७ टक्के म्हणजे ४६.६८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पुणे विभागातील धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ५३७.२८ टीएमसी इतकी असून, धरणांत १६.३१ टक्के म्हणजे ८७.६२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोकण विभागातील धरणांची साठवण क्षमता १३०.८४ टीएमसी असून, धरणांत ३३.८२ टक्के म्हणजे ४४.२५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

राज्यातील धरणांत दोन जुलैअखेर २१.८४ टक्के म्हणजे ३१२.४३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. पावसाचे अजून तीन महिने बाकी आहेत. त्यामुळे धरणे नक्कीच भरतील. पण, पश्चिम घाटातून कोकणात, समुद्राकडे वाहून जाणारे पाणी प्राधान्याने अडविले पाहिजे, अन्यथा नजीकच्या भविष्यात टंचाई अटळ आहे.

हरिश्चंद्र चकोर, निवृत्त अभियंता जलसंपदा विभाग

हेही वाचा : पिंपरी पोलिसांकडून आणखी दोन टोळ्यांवर ‘मोक्का’, आतापर्यंत ९८ गुन्हेगारांवर कारवाई

राज्यातील प्रमुख धरणांची स्थिती

धरण: उपयुक्त पाणीसाठा (टीएमसी)

मोडक सागर : १.०३८

तानसा : ०.९९३

भातसा : ८.३३५

पानशेत : २.१००

भाटघर : २.६६०

उजनी : – २२.११
कोयना धरण : १६.०६
राधानगरी : २.०६०
जायकवाडी : ३.४१३०
गोसीखुर्द : ६.७३२
काटेपुर्णा : ०.४०३
ऊर्ध्व वर्धा : ८.७६९

Story img Loader