पुणे : ‘व्यंगचित्र कलेमध्ये वाॅल्ट डिस्ने, शंकर, आर. के. लक्ष्मण या श्रेष्ठ व्यंगचित्रकारांबद्दल मी नेहमी आदर बाळगला. मात्र, मला या कोणासारखे व्हायचे नव्हते. वेगळा आशय आणि शैलीने स्वत:ची ओळख निर्माण करायची होती. मला शि. द. फडणीस व्हायचे होते’, अशी भावना व्यक्त करीत वयाच्या शंभरीमध्ये पदार्पण केलेल्या ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी खणखणीत आवाजात रविवारी आपला जीवनप्रवास उलग़डला. एरवी चित्रांतून पाहणाऱ्याच्या गालावर खुदकन हास्य उमटविणाऱ्या फडणीस यांनी आपल्या मनोगतातून मनोहारी शब्दचित्र रेखाटले.  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चतुरंग प्रतिष्ठनतर्फे आयोजित रंगसंमेलनात शि. द. फडणीस यांना ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार यांच्या हस्ते जीवनगौरव प्रदान करण्यात आला. पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, समितीचे सदस्य चारूहास पंडित, सुधीर जोगळेकर, सारंग दर्शने, डॉ. सागर देशपांडे यांच्यासह पुणेकर या सोहळ्याचे साक्षीदार होते.

हेही वाचा…बी. टी. कवडे रस्ता भागात सराफी पेढीवर सशस्त्र दरोडा, पिस्तुलाच्या धाकाने दागिन्यांची लूट

चित्र रेखाटताना चित्रकाराचा स्वतःशी संवाद होतो, असे म्हटले जाते. पण, माझा संवाद लोकांशी झाला. लोकांना माझे चित्र कळले नाही आणि त्या चित्राने त्यांच्याशी संवाद साधला नाही तर काय उपयोग?, असा सवाल फडणीस यांनी उपस्थित केला. पवार म्हणाले, ‘फडणीस यांनी काढलेले कोणतेही चित्र बोचरे नाही. अभिरूची काय असते याचे शिक्षण त्यांनी दिले. चांगले आणि वाईट ओळखण्याची दृष्टी त्यांनी चित्रातून दिली.’

सहस्रबुद्धे म्हणाले, ‘व्यंगचित्रांना वैविध्यपूर्ण विषय पुरविण्यात राजकारणातील व्यक्तींचे योगदान मोठे आहे. मात्र, फडणीस जाणीवपूर्वक राजकीय व्यंगचित्रांपासून दूर राहिले. त्यांनी प्रयोगशीलतेला महत्त्व दिले. पूर्वार्धात शर्वरी जमेनीस आणि कलाकारांनी ‘अर्घ्य’ नृत्यवंदना सादर केली. उत्तरार्धात विश्वमोहन भट्ट आणि त्यांचा नातू अथर्व भट्ट यांची मोहनवीणा वादनाची मैफल रंगली. ओंकार केतकर यांनी प्रास्ताविक केले. राहुल सोलापूरकर यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचा…मी पुणेकर असल्यावर शिक्कामोर्तब; मोठ्या मताधिक्याचे कारण, चंद्रकांत पाटील यांचे टीकेला उत्तर

दीनानाथ दलाल, राजा रविवर्मा यांनी चित्रकला लोकांपर्यंत पोहोचवली. अन्यथा ती केवळ राजवाड्यापुरती राहिली असती. बालगंधर्व, लता मंगेशकर यांच्यासारख्या दिग्गजांनी संगीत कला घराघरात पोहोचवली. संगीत किंवा नाटक या कलांच्या तुलनेत चित्रकला अजून रूजलेली नाही. चित्र बिघडले की लोकांना ते अर्कचित्र वाटते.   शि. द. फडणीस, ज्येष्ठ व्यंगचित्रकार

माझे रक्ताचे नाते

‘चतुरंग प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या हसरी गॅलरी प्रदर्शानाच्या ठिकाणी पंखा बाजूला करताना मला लागले. माझे बोट अक्षरशः रक्तबंबाळ झाले. चतुरंग प्रतिष्ठानशी माझे हे असे रक्ताचे नाते आहे…’ शि. द. फडणीस यांच्या हजरजबाबीपणाला दाद देताना त्यांनी केलेल्या मिश्कील टिप्पणीने सभागृहाची जणू ‘हसरी गॅलरी’ झाली.  

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran cartoonist shi da phadnis debuting at 100 shared his life journey expressing i wanted to be a phadnis pune print news vvk 10 sud 02