ज्येष्ठ लेखिका मृणालिनी जोशी ( वय ९५) यांचे गुरुवारी दुपारी वॄद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुलगे, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.रत्नागिरी येथे १३ फेब्रुवारी १९२७ रोजी जन्म झालेल्या जोशी या पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांच्या अनुग्रहित शिष्या होत्या. रत्नागिरी येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे घर शेजारीच असल्याने लहानपणापासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी त्यांचे घरोब्याचे संबंध होते. सावरकर त्यांना मुलगी मानत असत. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रेरणेने मॄणालिनी जोशी यांनी लिखाणाला सुरवात केली. देशभक्त, आध्यात्मिक व्यक्तींचे चरित्रलेखन, काव्यलेखन यावर त्यांनी भर दिला. जीवनात भेटलेल्या संत-महंतांच्या सहवासातील आठवणींवर आधारित आलोक हे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक त्यांनी लिहिले आहे.

हेही वाचा >>>पुण्याची तहान भागविण्यासाठी मुळशी धरणातून पाच टीएमसी पाणी ?

विद्यापीठातील निकालांची रखडपट्टी; नव्याने निकाल तयार करण्याची वेळ
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Three more gbs patients died Two deaths reported in Pune and one in Pimpri Chinchwad
पुण्यास पिंपरी-चिंचवडमध्ये ‘जीबीएस’मुळे आणखी तिघांचा मृत्यू; राज्यातील रुग्णसंख्या १४० वर
pune gbs loksatta news
पुण्यात गेल्या वर्षभरात आढळले ‘जीबीएस’चे १८५ रुग्ण; आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून माहिती समोर
Sasoon Hospital Pune.
‘GBS’मुळे आणखी एक मृत्यू, पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात नोंद; राज्यातील रुग्णसंख्या १२७ वर
Marotrao Gadkari passed away, Senior Gandhian thinker, Marotrao Gadkari , Marotrao Gadkari news,
ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत मा. म. गडकरी यांचे निधन, विनोबाजींच्या भूदानयज्ञात त्यांनी…
Results of the sixth exam for MahaRERA brokers announced
महारेराच्या दलालांच्या सहाव्या परीक्षेचा निकाल जाहीर, ७६२४ पैकी ६७५५ परीक्षार्थी उत्तीर्ण
GBS , Victim of GBS disease, Solapur, GBS disease ,
सोलापुरात जीबीएस आजाराचा संशयित मृत्यू

शहीद भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित ‘इन्किलाब’ ही कादंबरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री गुरुजी यांच्या जीवनावर आधारित ‘राष्ट्राय स्वाहा’ कादंबरी, शंकर महाराज यांच्या जीवनावर आधारित शंकरलीला, पावसचे स्वामी स्वरूपानंद यांच्या जीवनावर आधारित अमॄतसिद्धी, स्वा. सावरकर यांच्या जीवनातील अंतिम कालखंडावरील ‘अवध्य मी! अजिंक्य मी!!’ ही कादंबरी हे त्यांचे साहित्य गाजले.

हेही वाचा >>>लोणावळा : भुशी धरणात बुडून मुंबईतील महाविद्यालयीन युवकाचा मृत्यू

त्यांच्या इन्किलाब या कादंबरीचे हिंदी, इंग्रजी व गुजराथी या भाषांमध्ये तर राष्ट्राय स्वाहा या कादंबरीचे हिंदी व तेलुगू भाषेत झाले आहे. २००६ मध्ये डॉ. वि. रा. करंदीकर यांच्या हस्ते त्यांना स्नेहांजली पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. चिन्मय मिशनचे संस्थापक स्वामी चिन्मयानंद, आचार्य रजनीश ‘ओशो’, दत्तोपंत ठेंगडी, बाळासाहेब देवरस, अटलबिहारी वाजपेयी, जगन्नाथराव जोशी अश्या अनेक मोठ्या व्यक्तींचा त्यांना सहवास लाभला होता. ज्योतिष शास्त्राची आवड असलेल्या जोशी यांचे म.दा भट आणि व. दा भट या दिग्गजांशी संबध होते.

Story img Loader