सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंची निवड प्रक्रिया आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. विद्यापीठाकडून कुलगुरू निवडीसाठी जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागवण्यात आले आहेत. साधारपणे पुढील अडीच महिन्यांत विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू मिळतील. 

हेही वाचा- पुणे: प्रसाद वनारसे यांना तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार जाहीर

renowned flautist pandit ronu majumdar creates guinness world record by performing at indian classical music event with 546 musicians
५४६ संगीतकारांचा सांगीतिक आविष्कार; ज्येष्ठ बासरीवादक पंडित रोणू मजुमदार यांचा विश्वविक्रम; ‘गिनीज बुक’मध्ये नोंद
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Maha Kumbha Mela 2025 Shankar Mahadevan Mahesh kale Rahul Deshpande suresh wadkar and More To Perform at Grand Cultural Festival
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभ मेळ्यात होणार सुरांची बरसात; शंकर महादेवन यांसारख्या दिग्गज गायकांसह ‘हे’ मराठी कलाकार सादर करणार परफॉर्मन्स
Uday Samant request to the central government regarding Marathi language
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्व लाभ द्या; मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची केंद्र सरकारला विनंती
UGC proposed regulation to expand vice chancellor selection criteria
कुलगुरू निवड निकषांतील बदलांचे स्वागत
konkan itihas parishad national convention thane first february
कोकण इतिहास परिषदेचे १४ वे राष्ट्रीय अधिवेशन, डॉ. अरविंद जामखेडकर यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार
assistant professor without NET-SET
सहायक प्राध्यापक होणे नेट-सेटशिवायही शक्य?
monument , Satish Pradhan , Naresh Mhaske ,
ठाणे शहरात सतिश प्रधान यांच्या नावाची वास्तू उभारणार – खासदार नरेश म्हस्के

डॉ. नितीन करमळकर यांचा कुलगुरू पदाचा कार्यकाळ मेमध्ये संपला. त्यानंतर विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार  डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्याकडे सोपवण्यात आला. महाविकास आघाडी सरकारने विद्यापीठ कायद्यात केलेल्या बदलांना राज्यपालांनी मान्यता न दिल्याने कुलगुरू निवड प्रक्रिया रखडली होती. राज्यात जुलैमध्ये सत्तांतर झाल्यानंतर राज्य शासनाने विद्यापीठ कायद्यातील प्रस्तावित बदल रद्द केले. त्यानंतर कुलगुरू निवड शोध समिती सप्टेंबबरमध्ये नियुक्त करण्यात आली. त्यानंतर जवळपास दीड महिन्यांनी कुलगुरू शोध समितीने विद्यापीठामार्फत शनिवारी जाहिरात प्रसिद्ध केली. इच्छुकांना अर्ज करण्यासाठी १४ डिसेंबरची मुदत देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आलेल्या  अर्जांची छाननी, शोध समितीमार्फत मुलाखती आदी प्रक्रिया पूर्ण करण्यास साधारणपणे दोन ते अडीच महिने लागतील. त्यानंतर विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंची निवड होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. 

Story img Loader