हिंजवडी पोलिसांनी शरद मोहोळ टोळीचा सदस्य असलेल्या विकी दीपक चव्हाण ला पिस्तुलासह बेड्या ठोकल्या आहेत. हिंजवडी पोलिसांनी मेझा नाईन हॉटेल जवळ ही कारवाई केली आहे. विकी चव्हाण कडे दोन पिस्तूले आणि चार जिवंत काडतुसे पोलिसांना मिळाली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल मेझा नाईन जवळ काळ्या रंगाचा शर्ट घातलेला व्यक्ती हा कमरेला पिस्तूल लावून दुचाकी वर फिरत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ यांच्या टीमला मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी केंगले, गिलबिले, पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. खात्री करून आरोपी विकी दीपक चव्हाण ला ताब्यात घेतलं. पंचासमक्ष गुन्हेगार विकीची अंगझडती घेण्यात आली.
हेही वाचा…शाकंभरी नवरात्र महोत्सव, दुसर्या माळेला तुळजाभवानी देवीची रथअलंकार महापूजा
कमरेला दोन पिस्तुले आणि खिशात चार जिवंत काडतुसे मिळाली आहेत. ती हिंजवडी पोलिसांनी जप्त केली आहेत. या घटने प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकी चव्हाण हा शरद मोहोळ टोळीसाठी काम करत असल्याची माहिती समोर आलेली आहे. अद्याप त्याच्यावर किती गुन्हे आहेत. हे समजू शकलेलं नाही. विकी चव्हाण ने पिस्तुल नेमकी कशासाठी बाळगली हे अद्याप समजू शकलेल नाही. त्याचा तपास देखील पोलीस करत आहेत.