जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर खाजगी बसला अचानक आग लागली. ही घटना संध्याकाळी सातच्या सुमारास घडलेली आहे. सुदैवाने बसमधील ३३ प्रवासी बचावले आहेत. त्यांना तातडीने बसच्या खाली उतरविण्यात आले. आय.आर.बी आणि अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. परंतु, आगीत बस जळून खाक झाली आहे. अद्याप आगीचे कारण समजू शकले नाही.
हेही वाचा – बुधवारपासून राज्यभरात परतीचा पाऊस ? जाणून घ्या, हवामान तज्ज्ञांचा अंदाज
बंगळुरूवरून जयपूरकडे जात असलेल्या खाजगी बसला अचानक आग लागली. सुदैवाने बसमधील चालक आणि क्लीनरसह ३३ जण सुखरूप बाहेर पडले. ही घटना सातच्या सुमारास महामार्गावरील वाघजाई मंदिराकडून खाली उताराला लागल्यानंतर घडली. घटनास्थळी तातडीने आय.आर.बी आणि अग्निशमन दल पोहोचले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. परंतु, तोपर्यंत बस जळून खाक झाली होती. या घटनेमुळे जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.