पिंपरी : महायुतीमधील घटकपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जात असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरावर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. भाजपच्या उमा खापरे विधानपरिषदेवर आमदार असतानाही पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे शहरातील राजकारणात भाजपचे वर्चस्व वाढणार असून पक्षाचे चार आमदार होतील, तर गोरखे यांच्या रूपाने शहराला पाचवा आमदार मिळेल.

पिंपरी-चिंचवड अजित पवारांचा बालेकिल्ला होता. सलग १५ वर्षे तेच शहराचे ‘दादा’ होते. परंतु, २०१७ मध्ये राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांनी अजित पवारांच्या बालेकिल्याला सुरुंग लावला. महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता आणली. असे असले तरी शहरातील राजकारणावर पवार वर्चस्व ठेऊन होते, मात्र लोकसभेतील पक्षाच्या निराशाजनक कामगिरीनंतर विश्वासू सहकारी अजित पवार यांची साथ सोडण्याची तयारी करत असताना भाजपने शहरातील पदाधिकाऱ्यांना राजकीय ताकद देण्यास सुरुवात केली आहे. आता पिंपरीतून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले अमित गोरखे यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे.

pankaja munde manoj jarange
पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेच्या उमेदवारीला मनोज जरांगेंचा विरोध? सूचक वक्तव्य करत म्हणाले…
uddhav thackeray pradnya satav kharge
काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी, ठाकरे गटाच्या ‘त्या’ पत्राला केराची टोपली?
passenger dies in metro station in pune after falling down on escalator
मेट्रो स्थानकात प्रवाशाचा मृत्यू; सरकत्या जिन्यावरून उतरताना घटना; पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासणार
eknath shinde devdendra fadnavis
“कपटी लोकांनी आम्हाला छळलं”, शिंदेंच्या नेत्याची भाजपाच्या माजी केंद्रीय मंत्र्यावर टीका? महायुतीत जुंपली?
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
Anil Parab and Niranjan Davkhare
मुंबईत शिवसेना उबाठाच! पदवीधर मतदारसंघात अनिल परब विजयी, तर कोकणचा गड भाजपाच्या डावखरेंनी राखला
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा

हेही वाचा >>> आणखी एका गर्भवतीला झिकाचा संसर्ग; एरंडवणा परिसरात रुग्ण वाढले; शहरातील एकूण रुग्णसंख्या सहावर

भाजपने पिंपरी-चिंचवडवर विशेष लक्ष दिले असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी अमर साबळे यांना राज्यसभेची खासदारकी दिली. सचिन पटवर्धन यांना राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्षपद, सदाशिव खाडे यांना तत्कालीन पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्षपद आणि अमित गोरखे यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्षपद देऊन राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला होता. महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या उमा खापरे यांच्याकडे महिला मोर्चाचे अध्यक्षपद दिले होते. त्यानंतर त्यांना विधानपरिषदेवरही संधी दिली. चिंचवडमध्ये अश्विनी जगताप आणि भोसरीत महेश लांडगे भाजपचे आमदार असून आता गोरखे यांच्या रूपाने पक्षाचे चार आमदार होतील.

हेही वाचा >>> राज्यात जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

अमित गोरखे कोण?

गोरखे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील असून गेल्या ४० वर्षापासून पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास आहेत. मातंग समाजातील उच्चशिक्षित तरुण, युवा नेतृत्व आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख आहे. त्यांची शिक्षण संस्थाही आहे.

पिंपरी मतदारसंघ राष्ट्रवादीलाच?

गोरखे पिंपरीतून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. त्यांनी तयारी सुरू केली होती. आता त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर झाली असून भाजपच्या विधानसभेतील संख्याबळानुसार त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. गोरखे विधानपरिषदेवर गेल्याने पिंपरी मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला सुटण्याची शक्यता आहे.

विधानपरिषदेची उमेदवारी दिल्याबद्दल पक्ष नेतृत्वाचे आभार मानतो. भाजपने वंचित, दलित समाजाला न्याय दिला आहे. –अमित गोरखे