पुणे : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानांच्या परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या बंदला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले. बीड, सोलापूर, यवतमाळ परिसरात लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानांसमोर निदर्शने करण्यात आली. यापार्श्वभूमीवर शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानी आणि कार्यालयाच्या परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा – उच्च शिक्षण संस्थांनी शुल्क, अभ्यासक्रमाची माहिती संकेतस्थळावर देणे बंधनकारक, यूजीसीकडून नव्या धोरणाचा मसुदा जाहीर

हेही वाचा – विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शाळांमध्ये ‘स्कूल वेलनेस टीम’; केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून ‘उम्मीद’ मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध

समाजमाध्यमातून प्रसारित केल्या जाणाऱ्या मजकुरांवर पोलिसांनी नजर ठेवली आहे. पुणे, पिंपरी चिंचवड शहर, तसेच ग्रामीण भागात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. शहर आणि जिल्ह्यातील संवेदनशील असलेल्या सुमारे २०० ठिकाणी पोलिसांनी नजर ठेवली आहे. समाजमाध्यमातून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Story img Loader