लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी मुख्याधिकारी संवर्गातील सोलापूर महापालिकेतील उपायुक्त विजयकुमार खोराटे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

याबाबतचे आदेश शासनाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी-छापवाले यांनी प्रसृत केले आहेत. पिंपरी महापालिकेत अतिरिक्त आयुक्तांची तीन पदे आहेत. त्यातील दोन अतिरिक्त आयुक्त प्रतिनियुक्तीवरचे आणि महापालिका अधिकाऱ्यांकरिता पदोन्नतीसाठी एक अशी विभागणी आहे. जितेंद्र वाघ यांची २१ सप्टेंबर २०२१ रोजी अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने वाघ यांची महापालिकेतील प्रतिनियुक्ती संपुष्टात आणली असून, त्यांची सेवा त्यांच्या मूळ महसूल आणि वन विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे.

आणखी वाचा-पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी सचिंद्र प्रताप सिंह; ओमप्रकाश बकोरिया यांची बदली

वाघ यांच्या जागी मुख्याधिकारी संवर्गातील विजयकुमार खोराटे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. खोराटे यांनी यापूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेत सहायक आयुक्त म्हणून काम केले होते. दरम्यान, महापालिकेने अतिरिक्त आयुक्तपदी सनदी अधिकारी देण्याची शासनाकडे मागणी केली असताना पुन्हा मुख्याधिकारी संवर्गातील अधिकारी पालिकेत दिले आहेत. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे हे राज्य कर विभागाचे, तर नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे अतिरिक्त आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार दिला आहे.