बारामती : तालुक्यातील कन्हेरी येथील मारुती मंदिरामध्ये मारुतीरायाचे दर्शन घेऊन नारळ वाढवून माजी मंत्री विजय शिवतारे यांनी गुरुवारी आपल्या प्रचाराचा श्रीगणेशा केला. ज्येष्ठ नेते शरद पवार हेदेखील याच मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात करत असत.
शिवतारे म्हणाले, की गेल्या अनेक वर्षापासून पवार आपल्या निवडणूक प्रचाराचा नारळ वाढवून कन्हेरीच्या मारुतीरायाचे दर्शन घेतात, आणि प्रचाराला सुरुवात करतात, यावेळी मी प्रचाराची सुरुवात करीत आहे. पुरंदरमध्ये खंडेरायाचे यमाईदेवीचे दर्शन घेतले आणि मोरगावला गणपतीचे दर्शन घेऊन काटेवाडी नजीक असलेल्या मारुतीचे दर्शन घेऊन माझ्या प्रचाराची सुरुवात करत आहे. मारुती दैवत हे शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते. सर्वसामान्य जनतेसाठी मी निवडणूक लढवीत आहे.
हेही वाचा…“अजित पवारांच्या उर्मटपणाला लोक वैतागले आहेत, बारामतीत सुप्रिया सुळे..”, विजय शिवतारेंचं वक्तव्य
इथे आल्यानंतर मनाला बरं वाटले. या मंदिरामध्ये श्रीरामाचे आणि मारुतीचे दर्शन घेतले. सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी आहे, असा दावा शिवतारे यांनी केला.