ज्येष्ठ साहित्यिक-नाटककार विजय तेंडुलकर यांनी त्यांच्या हयातीत लिहिलेल्या शेवटच्या ललित लेखाचे अभिवाचन प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने केले. अंगावर शहारे आणणाऱ्या ‘तें’च्या लेखनातून हिंसेचे वेगळे रूप उलगडले आणि वाचकांनाही एक वेगळाच ‘अनुभव’ आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘युनिक फीचर्स’च्या ‘अनुभव’, ‘मुशाफिरी’, ‘कॉमेडी कट्टा’ यांसह ‘पासवर्ड’ या मुलांसाठीच्या मराठी, इंग्लिश आणि ऑडिओ दिवाळी अंकांचे प्रकाशन ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, युनिक फीचर्सचे सुहास कुलकर्णी आणि आनंद अवधानी या वेळी उपस्थित होते.

तेंडुलकरांना एका तरुणाचे अनावृत पत्र

घरातील वडीलधारे असलेल्या काकांनीच अवघ्या १६ वर्षांच्या मुलीवर केलेल्या अत्याचारानंतरची तिची झालेली मानसिकता, तिने उपस्थित केलेले प्रश्न हे सारे सोनाली कुलकर्णी हिच्या अभिवाचनातून प्रभावीपणे उलगडले. जणू ही युवती सोनाली कुलकर्णी हिच्या माध्यमातून तिची जीवनकथा सांगत असताना तेंडुलकरांच्या समर्थ लेखणीची प्रचिती आलीच. हिंसेचे एक वेगळेच रूप रसिकांसमोर आले. पूर्वार्धात रंगनाथ पठारे यांनी त्यांच्या दोन लघुकथांचे वाचन केले.

मधल्या भिंती कनिष्ठ मध्यमवर्गीय जाणिवांचे चित्रण

आळेकर म्हणाले, १९९० नंतर देशाचे अर्थकारण बदलत गेले. विविध वाहिन्यांचे आगमन झाले आणि समांतर धारेच्या संस्था मोडकळीस आल्या. अशा कालखंडामध्ये माहितीचे अचूक विश्लेषण करण्याचे काम करणाऱ्या युनिक फीचर्सच्या ‘अनुभव’ने दिवाळी अंकाच्या परंपरेत स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. अवधानी यांनी प्रास्ताविक केले. गौरी कानेटकर यांनी सूत्रसंचालन केले.