पुणे : ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ असा नावलौकिक असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची नियुक्ती करून नेमके काय साध्य करायचे आहे, असा सवाल उपस्थित करत राजकीय दबावातूनच झालेली ही नियुक्ती तत्काळ रद्द करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला ऐतिहसिक पार्श्वभूमी आहे. प्र-कुलगुरूंची निवड हा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे. या निर्णयाचा विद्यापीठाच्या भविष्यकालीन वाटचालीवर आणि विद्यापीठाच्या प्रशासन, शैक्षणिक गुणवत्तेवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. डॉ. काळकर हे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाचे अधिष्ठाता होते. २०१७ ते १८ या कालावधीत त्यांनी आर्थिक गुन्हे केले होते. पिंपरी चिंचवड येथील पोलीस ठाण्यात आयपीसी ४०६, ४०९, ४२० असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे त्याच्यांवर दाखल आहेत. असे असताना कुठलीही शहानिशा न करता, ही नियुक्ती कशी झाली? हा गंभीर प्रश्न आहे. अशाच नियुक्त्या करायच्या असतील तर संपूर्ण प्रक्रिया राबविण्याची गरजच काय? राजकीय नियुक्त्या असतील तरी थोडी खातरजमा करून त्या केल्या जाऊ शकतात. पण, अशा नियुक्त्या करून आपण जनतेला काय संदेश देऊ इच्छितो, असे म्हणत नियुक्ती तात्काळ रद्द करावी, भविष्यात अशा नियुक्त्या होणार नाहीत, याचीही खबरदारी घ्यावी, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

हेही वाचा – पुणे : नगर रस्त्यावरील चार गुंड तडीपार

हेही वाचा – दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या, राज्य मंडळाने केली घोषणा

प्र – कुलगुरू भ्रष्टाचार किंवा गैरवर्तनाच्या कोणत्याही आरोपांपासून मुक्त असावे. तसेच त्यांचा रेकॉर्ड निर्दोष असण्याची जोरदार मागणी होत असताना प्र – कुलगुरूंची स्वच्छ प्रतिमा असावी, कोणत्याही आरोपात त्यांचे नाव नसावे अशी अपेक्षा विद्यापीठ शिक्षक, शिक्षकेतर संघटना, विद्यापीठ समुदायाच्या एका वर्गाने व्यक्त केली असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र – कुलगुरूपदी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या डॉ. पराग काळकर यांची नियुक्ती करण्यामागे नेमके कारण काय? असाही प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay wadettiwar criticism on the selection of pro vice chancellor of savitribai phule pune university pune print news ccp 14 ssb
Show comments