पुण्याच्या मंचरमध्ये अवसरी खुर्द परिसरात बिबट्याने घोडीची शिकार करत ठार केले आहे. घटनेमुळे घोडी मालकाचे आर्थिक नुकसान झाले आहे. अवसरी खुर्द येथील अभंग मळ्यातील पवन भरत अभंग यांच्या शेतात ही घटना घडली आहे. घटनेमुळे शेतकरी आणि ग्रामस्थ भीतीच्या सावटाखाली आहेत. परिसरात तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुणे : पावसाळ्यामुळे मासेमारी बंद; मासळीच्या दरात वाढ

मिळालेल्या माहितीनुसार, ठका बापू बरकडे यांच्या शेळ्या- मेंढ्यांचा कळप पवन अभंग यांच्या शेतात बसविण्यात आला होता. शेळ्या मेंढ्यांबरोबरच एक वर्षाच्या घोडीचा देखील यात समावेश होता. पहाटेच्या सुमारास अचानक बिबट्याने घोडीवर हल्ला करून घोडीला ठार केले आहे, यात बरकडे यांचं मोठं नुकसान झालं आहे. तात्काळ परिसरात वन विभागाने पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गेल्या अनेक वर्षापासून या परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे. अनेकांवर हल्ले देखील केल्याचं वारंवार समोर आलेल आहे. त्यामुळे या बिबट्यांचा बंदोबस्त वन विभागाने करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Villagers demand to put cage to trapped leopard after killing a mare kjp 91 zws