िपपरी महापालिकेच्या हद्दीलगत असलेल्या िहजवडी, गहुंजेसह सात गावांचा िपपरी पालिकेत समावेश करण्याचा विषय पालिका निवडणुकीनंतर विचारात घेतला जाईल, असे चित्र पुढे आले आहे. राष्ट्रवादीचा प्रभाव असलेला हा पट्टा महापालिकेत समाविष्ट करून तेथे निवडणूक घेण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न होता. जेणेकरून तेथे हमखास यश मिळण्याचा विश्वास राष्ट्रवादी नेत्यांना होता. तथापि, आता हा विषय पालिका निवडणुकीनंतरच चर्चेत येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

िपपरी-चिंचवडच्या हद्दीलगतची २० गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा मूळ प्रस्ताव होता. त्यानुसार, चाकण, देहू, आळंदी, िहजवडीसह २० गावे महापालिकेत येणार होती. मात्र, या प्रस्तावास तीव्र विरोध झाला आणि विरोध करणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादीचे पदाधिकारी आघाडीवर होते. त्यामुळे तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी २० ऐवजी सात गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा सुधारित प्रस्ताव मांडला. िपपरी पालिकेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सभेत त्यास मान्यता दिली. त्यानुसार, िहजवडी, गहुंजे, जांभे, माण, मारूंजी, नेरे आणि सांगवडे या सात गावांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आला. सर्व प्रक्रिया पार पाडून याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले. पालिका निवडणुकीला सात ते आठ महिन्यांचा कालावधी राहिला आहे. उपलब्ध कालावधीत उर्वरित शासकीय प्रक्रिया पूर्ण होणे अवघड असल्याने गावे समाविष्ट होऊन तेथे पालिका निवडणुका होण्याची शक्यता नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. निवडणुकांविषयी येथील कार्यकर्त्यांना उत्सुकता असली, तरी अनेकांचा िपपरी पालिकेत येण्यास विरोध आहे. या पट्टय़ात राष्ट्रवादीचा प्रभाव आहे. हा भाग समाविष्ट होऊन तेथे निवडणुका झाल्यास राष्ट्रवादीला फायदा होण्याची शक्यता जास्त होती. मात्र, या निवडणुकांसाठी ही गावे पालिकेत येऊ शकणार नसल्याचे अजितदादांनीच आकुर्डीत बोलताना स्पष्ट केले. निवडणूक आयोगही मान्यता देणार नसल्याचे त्यांनीच स्पष्ट केल्याने तूर्त या विषयावर पडदा पडल्याचे मानले जाते.

Story img Loader