पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या किमान पाच जागा लढविण्याचा निर्णय शिवसंग्राम संघटनेने घेतला आहे. संघटनेच्या सर्वसाधरण सभेत हा निर्णय घेण्यात आला असून अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचे स्मारक आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देण्याची भूमिका घेणाऱ्या पक्षांबरोबरच आगामी निवडणुकीत युती किंवा आघाडी केली जाईल, अशी भूमिकाही या सभेत घेण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसंग्राम संघटनेची सर्वसाधारण सभा रविवारी पुण्यात आली. त्यानंतर बैठकीतील माहिती शिवसंग्रामच्या अध्यक्ष डाॅ. ज्योती मेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अरबी समुद्रातील शिवाजी महाराज यांचे स्मारक आणि मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देण्यासंदर्भात या सभेत चर्चा करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची यासंदर्भात भेट घेण्यात येणार आहे. आगामी निवडणुकीत मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि मुंबई या ठिकाणच्या पाच जागा लढविण्यात येणार आहेत. मराठा आरक्षण आणि शिवाजी महाराज यांचे स्मारकासंदर्भातील आमच्या मागण्यांना पाठिंबा देणाऱ्यांबरोबरच आगामी निवडणूक लढविण्यात येईल. त्यादृष्टीने महायुती आणि महाविकास आघाडीबरोबर प्राथमिक चर्चा सुरू आहे, असे डाॅ. मेटे यांनी सांगितले. विधानसभेची निवडणूक स्वत: लढविणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
Shivaji Park ground, Shivaji Park, MNS Shivaji Park,
शिवाजी पार्कचे मैदानाचा निर्णय गुलदस्त्यात, महायुतीने मैदान अडवल्यामुळे ४५ दिवसांची मर्यादा संपल्याचा मनसेचा आरोप
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
maharashtra vidhan sabha election 2024 Sanjay Puram vs Rajkumar Puram in Amgaon-Devari constituency
आमगाव-देवरीत संजय पुराम विरुद्ध राजकुमार पुराम सामना; माजी आमदारापुढे माजी सनदी अधिकाऱ्याचे आव्हान
ss mp shrikant shinde
“चोवीस तास उपलब्ध राहणाऱ्या आमदाराचा विचार करा”, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आवाहन
mp shrikant shinde
“आवडत असेल किंवा नसेल महायुतीचा धर्म पाळून सुलभा गणपत गायकवाड यांचा प्रचार करा !”, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे वक्तव्य

हेही वाचा : पुणे: स्वमग्न मुलांसाठी ‘फर्ग्युसन’मध्ये उद्यानाची निर्मिती… काय आहे वेगळेपण?

शिवसंग्रामच्या अध्यक्षपदी डाॅ. ज्योती मेटे

या सभेत संघटनेची नवी कार्यकारिणीही पुढील पाच वर्षांसाठी जाहीर करण्यात आली. डाॅ. ज्योती मेटे यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड करण्यात आली. प्रदेश उपाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते प्रभाकर कोलंगडे आणि छत्रपती संभाजीनगरचे सलीम पटेल यांची निवड करण्यात आली. तर सरचिटणीसपदी नांदेडचे नितीन लाठकर, खजिनदारपदी मुंबईचे राम जगदाळे, चिटणीस पदी भंडाऱ्याचे प्रा. डी.एस.कडव , मुंबईचे योगेश विचारे आणि सदस्यपदी हिंदुराव जाधव, भरत लगड ,बालाजी जाधव, सुंदर मस्के यांची निवड करण्यात आली.