पूर्वप्राथमिक शिक्षण धोरण, अभियांत्रिकी महाविद्यालयांचे धोरण, शाळांनी धाब्यावर बसवलेला शुल्क नियमन कायदा, विद्यापीठांमध्ये होणारी पेपरफुटी, विद्यापीठ कायद्यातील बदल.. प्रश्न कोणताही असो उत्तर एकच आहे, शांतता.. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा अभ्यास सुरू आहे!
तावडे यांनी पुण्यातील शिक्षणक्षेत्राशी संबंधित संघटनांची गुरुवारी पुण्यात भेट घेतली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एका कार्यक्रमानंतर विद्यापीठाची अधिकार मंडळे, विद्यार्थी संघटना, स्वयंसेवी संघटना, संस्थाचालक यांच्याशी तावडे यांनी संवाद साधला. या वेळी माध्यमांशीही तावडे यांनी संवाद साधला. पूर्व प्राथमिक धोरण, अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये रिक्त राहणाऱ्या जागा, शाळांमध्ये विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना, विद्यापीठांमधील पेपरफुटी, गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला विद्यापीठ कायद्यातील बदलांचा विषय, शाळांनी धाब्यावर बसवलेला शुल्क नियंत्रण कायदा अशा अनेक विषयांवर तावडे यांना प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांवर ‘सत्तेत येऊन २१ दिवसच झाले आहेत. अभ्यास सुरू आहे.’ असे उत्तर त्यांच्याकडून मिळाले.

Story img Loader