अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनामध्ये नयनतारा सहगल यांना त्यांची भूमिका मांडू द्यावी. ती भूमिका पटली नाही म्हणून विरोध झाला तर समजू शकतो, पण सहगल यांना संमेलनात येऊ न देण्याची भूमिका चुकीची आहे, अशा शब्दांत सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रविवारी टोला लगावला. तावडे म्हणाले, अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलन हे कोणत्याही वादविवादापासून दूर राहून झाले पाहिजे. सहगल यांनी संमेलनात येऊन भूमिका मांडल्यानंतर त्याला विरोध झाला तर ते समजून घेऊ  शकतो. मात्र, त्यांना येऊ  न देणे योग्य नाही, असे त्यांनी म्हटले.

Story img Loader