पुणे : ‘नो महाराष्ट्र ओन्ली राष्ट्र’ असे सांगत भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी सध्या तरी महाराष्ट्रात परतणार नसल्याचे सांगितले. येत्या लोकसभा निवडणुकीत केंद्रात चांगल्या संख्येने खासदार निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाला विनोद तावडे यांनी सोमवारी हजेरी लावली. त्यानंतर तावडे माध्यमांशी बोलत होते.

भाजपाने चार राज्यांत नवीन चेहरे दिले. मध्य प्रदेशात मोहन यादव हे नवीन नाव असले, तरी ते अपरिपक्व नाहीत. मोहन यादव तीन वेळा आमदार आहेत. प्रस्थापित नाव सोडून ते नाव का आले असेल असे वाटत असेल, पण पक्षाने दिलेले काम करावे लागेल हे लक्षात घेतले पाहिजे. पंकजाताई महाराष्ट्रात सक्रिय आहेत आणि केंद्रातही त्यांचे काम दिसते, असे तावडे यांनी सांगितले.

हेही वाचा – करोना उद्रेकाची धास्ती! केरळमधील नवीन उपप्रकारानंतर केंद्र सरकारचे सर्व राज्यांना आदेश

हेही वाचा – अज्ञात वाहनाच्या धडकेत नऊ वर्षाचा बिबट्याचा मृत्यू

इंडिया आघाडी मुळात होणारच नाही. जागा वाटपावरुन त्यांच्यात तेढ आहे. पंजाब आणि बंगालमध्ये त्यांना जागा देणार नाही, असे सांगितले आहे. मग राहिल्या कुठे जागा ? असा प्रश्न तावडे यांनी उपस्थित केला.

Story img Loader