विदर्भ, मराठवाडय़ामध्ये झालेल्या गारपिटीची वैज्ञानिक चिकित्सा होणे गरजेचे असून त्यासाठी तज्ज्ञ समितीची स्थापना करणे गरजचे आहे, अशा मागणीचे पत्र सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.
‘गारपीट झालेल्या ठिकाणाची प्रत्यक्ष परिस्थिती आणि ज्या प्रमाणात गारा पडत आहेत ते पाहता ही प्रासंगिक हिमवृष्टी आहे. त्यामुळे याकडे केवळ गारपीट म्हणून न पाहता जे घडले त्याची वैज्ञानिक चिकित्सा करणे गरजेचे आहे. त्यासाठी लवकरात लवकर तज्ज्ञ समिती स्थापन होण्याची गरज आहे,’ असे डॉ. चौधरी यांनी पत्रात म्हटले आहे. समितीच्या कार्यकक्षा ठरवताना काही बाबी त्यात समाविष्ट कराव्यात असेही त्यात लिहिले आहे. गारपीट आणि वादळी वारे यांच्यामुळे झालेले प्रत्यक्ष शेतीचे आणि पर्यावरण विषयक नुकसान यांचे नेमके मूल्यमापन, एकूण प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणामांचे मूल्यांकन, मागील काही दशकांत घडलेल्या अशा घटना, त्यांची तीव्रता आणि वारंवारिता यांचा आणि आत्ताच्या घटनेचा तुलनात्मक अभ्यास, याचा जागतिक तापमान वाढीशी काही संबंध आहे का याचा शास्त्रीय शोध, जल-वायू परिवर्तन आणि या घटनांचा संबंध काय याचा शास्त्रीय शोध, स्थानिक, तात्कालिक व दीर्घकालीन उपाययोजना, आपत्ती व्यस्थापन आराखडा तयार करणे, पर्यावरणीय नुकसान भरपाई बाबत निश्चित धोरण या बाबींचा समावेश करावा, अशी मागणी डॉ. चौधरी यांनी केली आहे.
‘गारपिटीच्या घटनेची वैज्ञानिक चिकित्सा करा’
विदर्भ, मराठवाडय़ामध्ये झालेल्या गारपिटीची वैज्ञानिक चिकित्सा होणे गरजेचे आहे, अशा मागणीचे पत्र सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.
First published on: 12-03-2014 at 02:45 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vishvambar chaudhari demands scientific diagnosis of hailstorm