राहुल गांधी मंचावर उपस्थित असल्याने इंग्रजीतून भाषण करण्यास निघालेले कॉंग्रेस आघाडीचे पुण्यातील उमेदवार विश्वजीत कदम यांना स्वतः राहुल यांनीच मध्येच थांबवत हिंदीतून बोलण्यास सांगितले. त्यामुळे कदम यांना आपले सुरुवातीचे भाषण इंग्रजीतून आणि उर्वरित हिंदीतून करावे लागले.
विश्वजीत कदम यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांनी पुण्यातील एसएसपीएमएसच्या मैदानावर जाहीर सभा घेतली. यावेळी विश्वजीत कदम यांनी राहुल गांधी यांना समजावे, म्हणून इंग्रजीतून आपले भाषण करण्यास सुरुवात केली. त्यांनी कॉंग्रेसने गरिबांसाठी केलेल्या कामाचा पाढा इंग्रजीतून सांगण्यास सुरुवात केल्यावर राहुल गांधी यांनी माणिकराव ठाकरेंकरवी कदम यांना इंग्रजीऐवजी हिंदीतून आपले भाषण करण्याचा संदेश पाठविला. त्यानंतर लगेचच विश्वजीत कदम यांनी उर्वरित भाषण हिंदीतून करण्यास सुरुवात केली.
सभेसाठी आलेल्या बहुतांश लोकांना इंग्रजी समजत नसताना विश्वजीत कदम यांनी आपले विचार मांडण्यासाठी तीच भाषा का निवडली, असा प्रश्न सभेला उपस्थित असलेले काही लोक एकमेकांना विचारत होते.

Story img Loader