दिवंगत माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त पुण्यातील धनकवडी येथील भारती विद्यापीठ परिसरात, भारती सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि स्टुडंटस हौसिंग कॉम्प्लेक्सचं उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या हस्ते झाले. तर यावेळी सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांना ‘डॉ.पतंगराव कदम स्मृती पुरस्कार’ने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजक काँग्रेस पक्षाचे नेते आमदार विश्वजीत कदम हे देखील उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा एकाच गाडीतून प्रवास, राजकीय चर्चांना उधाण

VIDEO ::

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/01/Vishwajit-Kadam-has-fallen-at-the-feet-of-Fadnavis.mp4

भारती विद्यापीठ येथील आजचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने चर्चेत राहिला असून या कार्यक्रमास शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर येणार असल्याने दोन्ही नेते काय बोलणार याकडे लक्ष होते. पण या दोघांनी राजकीय भाष्य करणे टाळले. मात्र या कार्यक्रमाच्या सुरवातीलाच, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल झाले. त्यावेळी विश्वजीत कदम यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताच, विश्वजीत कदम हे देवेंद्र फडणवीस यांच्या पाया पडल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. या गोष्टीमुळे मागील अनेक महिन्या पासून विश्वजीत कदम हे भाजपात प्रवेश करणार या चर्चेला पुन्हा एकदा सोशल मीडियावर सुरुवात झाली आहे.

शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा एकत्र प्रवास

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णालयाची इमारत पाहिली. त्यानंतर स्टाफ सोबत फोटो काढल्यानंतर तेथून पाच मिनिटाच्या अंतरावर कार्यक्रमाचे ठिकाण होते. ते लक्षात घेता,शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना आपण सोबत जाऊ या असे म्हणताच देवेंद्र फडणवीस गाडीत बसले आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी रवाना झाले. त्यामुळे शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यामध्ये प्रवासातील त्या पाच मिनिटात नेमकी काय चर्चा झाली असेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vishwajit kadam respect to devendra fadanvis social media is again discussing he will join the bjp svk 88 ysh