इंदापूर: शरीराचा कोणताही अवयव अधू झाला किंवा गेला तर आयुष्य जगता येते. परंतु डोळ्याची दृष्टी गेली तर, मात्र संपूर्ण आयुष्यात अंधार पसरतो. त्याकरिता एच. व्ही. देसाई रुग्णालयाने हाती घेतलेले कार्य निश्चितच गौरवास्पद असून त्याकरिता समाजातील सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. मोहम्मदवाडी, हडपसर-पुणे येथील एच. व्ही. देसाई रुग्णालयाअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ४१व्या व्हिजन सेंटरचा शुभारंभ भिगवण येथील डॉ. जयप्रकाश खरड यांच्या श्रद्धा क्लीनिकमधील जागेत करण्यात आला. त्याचे उद्घाटन भरणे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी रुग्णालयाचे असोसिएट डायरेक्टर सुधीर सुधाल, चीप ऑपरेटिंग ऑफिसर डॉ. सुशीला कवडे-भोसले, भिगवणचे सरपंच गुराप्पा पवार, उपसरपंच सत्यवान भोसले, भिगवण ट्रोमा सेंटरच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मानसी देवकाते, भिगवण मेडिकोज असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संकेत मोरे, रोटरी क्लब ऑफ भिगवणचे अध्यक्ष संतोष सवाने, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमिलाताई जाधव, भिगवणच्या माजी सरपंच हेमाताई माडगे, मदनवाडीचे माजी सरपंच तुकाराम बंडगर, नियोजन मंडळाचे माजी सदस्य सचिन सपकळ हे उपस्थित होते.

डॉ. सुशीला कवडे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणामध्ये एच. व्ही. देसाई रुग्णालया अंतर्गत देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा आणि संस्थेअंतर्गत येणाऱ्या सर्व उपक्रमांचा आढावा घेतला आणि संपूर्ण महाराष्ट्र मोतीबिंदू मुक्त करण्याचा संस्थेचा संकल्प असल्याचे सांगितले. सुधीर सुधाल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना व्हिजन सेंटरची असलेली वाटचाल स्पष्ट केली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. खरड यांचेही यावेळी भाषण झाले.

धन्वंतरी पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सीनियर मॅनेजर डॉ. प्रवीण नरवाडकर व व्हिजन सेंटर मॅनेजर प्रसाद ताठे यांनी उपस्थित सर्व पाहुण्यांचा सत्कार केला. सूत्रसंचालन दीपक वाघ यांनी तर आभार प्रदर्शन प्रसाद ताठे यांनी केले. दरम्यान क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. त्यांच्या हाताला बँडेज असतानाही श्री भरणे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले गळ्यामध्ये हात बांधलेल्या अवस्थेत त्यांनी दीप प्रज्वलन केले.