राज्यातील शिक्षणाची आणि शाळांची गुणवत्ता वाढवून ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ करण्याचे उद्दिष्टय़ गाठण्यासाठी उद्योग, स्वयंसेवी संस्था, व्यक्ती यांच्या मदतीने पुढे जाण्याची शिक्षण विभागाची योजना आहे. त्यासाठी विभागाने संस्थांना आवाहन केले आहे.
राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र योजना राबवण्यात येत आहे. गुणवत्ता वाढ आणि शाळांच्या भौतिक विकासाचे उद्दिष्टय़ विभागाने ठेवले आहे. त्यासाठी खासगी संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. आर्थिक मदत किंवा प्रत्यक्षात स्वयंसेवक म्हणूनही राज्याच्या शिक्षण विभागाबरोबर काम करता येणार आहे. आर्थिक पाठबळ आवश्यक असणाऱ्या गरजांची यादी शासनाने जाहीर केली आहे. आर्थिक मदत करू इच्छिणाऱ्या संस्थांसाठी शाळा दत्तक घेणे, संगणक, टॅबलेट, प्रोजेक्टर, ग्रंथालयासाठी पुस्तके, शैक्षणिक साहित्य, खेळाचे साहित्य देणे, सौरऊर्जा प्रकल्प उभारणे, स्वयंपाक घर, संरक्षक भिंत, स्वच्छतागृहांचे बांधकाम करणे, निवासी शाळा दत्तक घेणे, शाळेत पिण्याच्या पाण्याची आणि हात धुण्याची सुविधा उपलब्ध करून देणे असे पर्याय देण्यात आले आहेत.
आर्थिक जबाबदारी उचलणे शक्य नसलेल्या संस्थांसाठी शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी मदत करणे, लोकसहभाग वाढवण्यासाठी प्रकल्पांचे आयोजन करणे अशी मदत करता येणार आहे. याबाबतची माहिती आणि अर्ज महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या ँ३३स्र्://६६६.े२ूी१३.१ॠ.्रल्ल/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Story img Loader