पिंपरी : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीनिमित्त शनिवारी (२३ नोव्हेंबर) वाकड, हिंजवडी आणि तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी प्रसृत केले आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी थेरगाव येथील कामगार भवन येथे होणार आहे. भोसरी, पिंपरी मतदारसंघाची मतमोजणी बालेवाडी येथील क्रीडा संकुलात तर, मावळ मतदारसंघाची मतमोजणी तळेगाव दाभाडे येथील नूतन विद्यालयात शनिवारी होणार आहे. या मतमोजणीनिमित्त परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
वाकड वाहतूक विभागाअंतर्गत तापकीर चौक येथून थेरगावकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने काळेवाडी रोडने काळेवाडी फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील. काळेवाडी पोलीस स्टेशन येथून तापकीर चौकाकडे जाणारी वाहने पाण्याची टाकी मार्गे इच्छित स्थळी जातील. माध्यमिक विद्यालय थेरगाव समोरील चौकातून तापकीर चौकाकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने माध्यमिक विद्यालय थेरगांव समोरील चौकातून उजवीकडे वळून ग प्रभागच्या रोडने इच्छित स्थळी जातील. हिंजवडी वाहतूक विभागाअंतर्गत गोदरेज सर्कल, म्हाळुंगे गाव ते राधा चौक व राधा चौक ते म्हाळुंगे गाव ते गोदरेज सर्कल या रस्त्यावरील जड व अवजड वाहने चांदे-नांदे येथून डावीकडे वळून माण व हिंजवडी मार्गे इच्छित स्थळी जातील. बाणेर रोड व राष्ट्रीय महामार्गावरून येणारी जड अवजड वाहने राधा चौकातून उजवीकडे वळून वाकड नाका मार्गे हिंजवडी व इच्छित स्थळी जातील. बालेवाडी स्टेडियम मुख्य प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर गोदरेज सर्कल व म्हाळुंगे गावातून येणारी – जाणारी हलकी वाहने उत्तम स्वीट चौक येथून उजवीकडे वळून म्हाळुंगे पोलीस चौकीपासून पुढे मुख्य रस्त्याने राधा चौक येथून इच्छित स्थळी जातील.
हेही वाचा – कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या मताधिक्याची चर्चा
हेही वाचा – मतटक्का वाढण्यास ‘लाडक्या बहिणीं’चा हातभार?
तळेगाव दाभाडे वाहतूक विभागा अंतर्गत मुंबईकडून तळेगाव – चाकण रोडने एचपी चौकाकडे जाणारी जड व अवजड वाहने वडगाव फाटा एमआयडीसी रोड मार्गे वडगाव कमान येथे डावीकडे वळून तळेगाव, नवलाख उंब्रे, बधलवाडी भामचंद्र डोंगर, आंबेठाण एचपी चौक मार्गे इच्छीत स्थळी जातील. मुंबईकडून चाकणच्या दिशेने जाणारी हलकी वाहने व दुचाकीस वडगाव फाटा निलया सोसायटी काॅर्नरकडून मंत्रा सिटी रोड मार्गे बीएसएनएल कॉर्नर, सीटी कार्नर, हिंदमाता भुयारी मार्ग येथे उजवीकडे वळून चाकण बाजूकडे जातील. चाकण एचपी चौकाकडून मुंबईच्या दिशेने जाणारी जड व अवजड वाहने एचपी चौक आंबेठाण, भामचंद्र डोंगर, नवलाख उंब्रे, तळेगाव एमआयडीसी मार्गे इच्छीत स्थळी जातील. बधलवाडी चाकणकडून मुंबईच्या दिशेने जाणारी हलकी वाहने व दुचाकी जनसेवा वाचनालय इंद्रायणी महाविद्यालय येथून हिंदमाता भुयारी मार्ग, शांताई सीटी कार्नर, बीएसएनएल कॉर्नर, मंत्रासिटी रोड मार्गे इच्छीत स्थळी जातील.