पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीतील पदवीधर गटाच्या दहा जागांसाठी रविवारी (२० नोव्हेंबर) मतदान होणार आहे. पुणे, अहमदनगर, नाशिक आणि सिल्वासा येथील एकूण ७१ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, निवडणूक प्रशासनातील २०० हून अधिक प्राध्यापक, अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून निवडणुकीवर देखरेेेख करण्यात येईल. विद्यापीठ निवडणुकीला यंदा पहिल्यांदाच राजकीय स्वरूप आल्याने या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील तरतुदींनुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर पदवीधर गटातून दहा उमेदवार निवडून देण्यासाठी ही निवडणूक होत आहे. अधिसभेवर पुढील पाच वर्षांसाठी या प्रतिनिधींची निवड केली जाणार आहे. एक हजार मतदारांमध्ये एक बूथ प्रतिनिधी असे ११४ बूथ असणार आहेत. तर पाच हजार मतदारांमध्ये एक केंद्र निरीक्षक आहे. एकूण ७१ केंद्रांवर मतदान होईल. त्यात पुणे शहर येथे २६, पुणे ग्रामीण येथे १०, अहमदनगर १५, नाशिक १९, तर सिल्वासा येथे एक मतदान केंद्र आहे.
पदवीधर मतदारसंघातून अधिसभेच्या दहा जागांसाठी एकूण ३७ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले असून त्यामध्ये पाच खुल्या जागांसाठी १८ उमेदवार, एका अनुसूचित जाती प्रवर्गासाठी पाच उमेदवार, एका अनुसूचित जमाती प्रवर्गातील जागेसाठी ४ उमेदवार, विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील एका जागेसाठी ४ उमेदवार, इतर मागास प्रवर्गासाठी एका जागेसाठी चार उमेदवार तर महिला प्रवर्ग एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात आहेत.

maharashtra govt introduces new guidelines for school picnic
शैक्षणिक सहलींसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून दक्षतेची सूचना
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
education board warning against schools for obstructing students while filling exam application zws
परीक्षा अर्ज भरताना अडवणूक केल्यास शाळांवर कारवाई;  शिक्षण मंडळाचा इशारा
loksatta lokankika Mumbai thane
महाविद्यालयांत तालमींचा कल्ला! ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मुंबई, ठाणे विभागीय अंतिम फेरीसाठी युवा रंगकर्मींचा कसून सराव
academic degree on experience
विश्लेषण : अनुभवाच्या आधारे पदवी कशी मिळणार?
Important information regarding Group-B Non-Gazetted and Group-C cadre posts outside MPSC purview
स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती! गट ब (अराजपत्रित), गट क संवर्गातील पदे एमपीएससीच्या कक्षेत आणण्यासाठी एक पाऊल पुढे…
NEET Postgraduate Exam Schedule Announced Wardha news
नीट पदव्युत्तर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; वैद्यक आयोग म्हणतो…
Chief Minister Ladki Bahin Yojana received great response from Pimpri Chinchwad city
पिंपरीत सर्वाधिक लाडक्या बहिणीचे अर्ज बाद

हेही वाचा: मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर कारच्या धडकेने महिलेचा मृत्यू

निवडणुकीला राजकीय स्वरूप
भारतीय जनता पक्षाशी संबंधितांचा विद्यापीठ विकास मंच, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या महाविकास आघाडीचे सावित्रीबाई फुले परिवर्तन पॅनेल, काँग्रेसने पाठिंबा दिलेले छत्रपती शाहू महाराज परिवर्तन पॅनेल, हिंदू महासभा यांनी आपापले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. पहिल्यांदाच या निवडणुकीला राजकीय स्वरुप प्राप्त झाल्याने या निवडणुकीला महत्त्व मिळाले आहे.

Story img Loader