पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. सासवड येथील तहसीलदार कार्यालयात मतदान यंत्रे (ईव्हीएम, कण्ट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट) यंत्रे ठेवण्यात आली आहेत. चोरट्यांनी तहसीलदार कार्यालयाचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. खोलीतील लोखंडी मांडणीवर मतदान यंत्रे ठेवण्यात आली होती. चोरट्यांनी त्यापैकी मतदान यंत्रे कशी काम करतात, यासाठी ठेवण्यात आलेले (डेमो) मतदान यंत्र चोरून नेले. या घटनेची सासवड पोलिसांना माहिती मिळाली. पोलिस आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण पोलिसांनी ताब्यात घेतले. चित्रीकरणात तीन चोरटे आढळून आले आहेत. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणाची केंद्रीय निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली असून कारवाईला सुरूवात करण्यात आली आहे.

याबाबत बोलताना उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर म्हणाल्या, ‘कण्ट्रोल युनिट सील तोडून चोरट्यांनी पळवून नेले आहे. ही घटना घडली, तेव्हा सुरक्षा कर्मचारी जागेवर उपस्थित नव्हते. हे सुरक्षारक्षक जागेवर नसल्याने यंत्र चोरीला गेल्याची माहिती मिळत आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे पोलीस आणि प्रशासनाने चौकशी केल्यानंतर आम्ही पोलीस ठाण्यात गेलो होतो, असे सांगण्यात आले. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून संबंधिता दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाचा अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठविण्यात आला आहे. कण्ट्रोल युनिट चोरीला गेले असून पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास चालू असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख दहा तास सासवड तहसील कार्यालयात हजर होते. पोलिसांकडून पथके कार्यान्वित करून यंत्र चोरणाऱ्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी जिल्हा प्रशासनाला कळविले आहे.’

देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं? बावनकुळे म्हणाले... (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
one nation one election
मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाची ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी
ed to hand over assets worth 125 crores of mehul choksi to banks
पीएनबी गैरव्यवहार प्रकरणः मेहूल चोक्सीविरोधात ईडीची मोठी कारवाई, १२५ कोटींच्या मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकांना सुपूर्त करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात
taloja housing project fraud case court takes serious note of the plight of flat buyers
तळोजास्थित गृहप्रकल्प कथित फसवणूक प्रकरण : सदनिका खरेदीदारांच्या दुर्दशेची न्यायालयाने घेतली गंभीर दखल
MIM In Delhi Election 2025.
Delhi Election : दिल्लीतील २०२० च्या दंगलीतील आरोपी लढवणार विधानसभा, ओवैसींच्या पक्षाने दिली उमेदवारी
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक
Story img Loader