पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. सासवड येथील तहसीलदार कार्यालयात मतदान यंत्रे (ईव्हीएम, कण्ट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट) यंत्रे ठेवण्यात आली आहेत. चोरट्यांनी तहसीलदार कार्यालयाचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. खोलीतील लोखंडी मांडणीवर मतदान यंत्रे ठेवण्यात आली होती. चोरट्यांनी त्यापैकी मतदान यंत्रे कशी काम करतात, यासाठी ठेवण्यात आलेले (डेमो) मतदान यंत्र चोरून नेले. या घटनेची सासवड पोलिसांना माहिती मिळाली. पोलिस आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण पोलिसांनी ताब्यात घेतले. चित्रीकरणात तीन चोरटे आढळून आले आहेत. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणाची केंद्रीय निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली असून कारवाईला सुरूवात करण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा