पुणे : मतदानाची वेळ संपल्यानंतरही कसबा मतदारसंघात अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. कसबा मतदारसंघात सायंकाळी पाचवाजेपर्यंत ४५.२५ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी सहानंतरही रांगा लागल्याने मतदानाचा टक्का वाढणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. गेल्या निवडणुकीत या मतदारसंघात ५१.५४ टक्के मतदान झाले होते.
हेही वाचा – Loksatta Pune Vardhapan Din 2023 : पोलीस दलाचे सक्षमीकरण गरजेचे
मतदानाची वेळ सायंकाळी सहा वाजता संपली. त्यानंतर कसबा मतदारसंघात प्रामुख्याने लोहियानगर, गंजपेठ, काशेवाडी, हरकानगर आदी झोपडपट्ट्या असलेल्या भागांतील मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावल्या. सायंकाळी पाचनंतर या केंद्रांवर मतदानासाठी गर्दी केली. मतदानाची वेळ संपल्यावर केंद्रांचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले. त्यावेळी रांगेत उभ्या असलेल्या सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.