नारायणगाव : लहान वया पासून ते शालेय शिक्षण असो कि महाविद्यालयीन शिक्षण एकत्र वाढलेल्या दोन जिवलग मैत्रिणी कु. वृषिता प्रितम गोरडे आणि कु. समिक्षा मारुती वाबळे यांची मुंबई पोलिस दलात पोलिस शिपाई या पदावर निवड झाली आहे. या मैत्रणीचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत तसेच माध्यमिक शिक्षण श्री ज्ञानेश्वर विद्यालय सावरगाव येथे झाले आहे . आई – वडिल शेतकरी असल्याने त्या सुट्टीच्या दिवशी शेतीकामातही मदत करीत असे .

कु. वृषिता गोरडे ही बी.कॉम. च्या शेवटच्या वर्षाला तर कु. समिक्षा वाबळे बी.ए. च्या शेवटच्या वर्षात श्री शिवछत्रपती महाविद्यालयात शिक्षण घेत आहे . दोघींनी अभ्यासाचे योग्य नियोजन करून हे यश संपादन केले आहे . त्यांच्या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने या दोन्ही यशस्वी विद्यार्थीनींचा सन्मान संस्थेचे अध्यक्ष ॲॅड संजय शिवाजीराव काळे केला आणि त्यांच्या यशाबद्दल विशेष कौतुक केले आहे . यावेळी अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. विलास कुलकर्णी , प्राचार्य डॉ. महादेव वाघमारे , उपप्राचार्य डॉ. रविंद्र चौधरी हे उपस्थित होते .

बस्ती ग्रामस्थांच्या वतीने कु. वृषाली गोरडे आणि कु. समिक्षा वाबळे हिचा सन्मान माजी जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे , बस्ती गावचे सरपंच प्रकाश गिदे ,हभप प्रसाद महाराज वाबळे , रोहिदास गोरडे , गुलाब गोरडे , गोरक्ष जाधव , नितिन गोरडे व अतुल वाबळे यांनी केला . या दोघीच्या उज्वल यशाबद्दल सावरगाव पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून.

” लहान वयातच सरकारी नोकरीचे आकर्षण होते . समाजासाठी काम करण्याची तळमळ आणि प्रामाणिक प्रयत्न , जिद्द व अभ्यासात सातत्य या त्रिसूत्रीमुळे निश्चित यश मिळविता आले . आम्ही आता पहिली लढाई जिंकलो असलो तरी भविष्यात पोलिस अधिकारी  होण्याचं स्वप्न आम्ही दोघेही नक्कीच पूर्ण करणार आहोत ‘- वृषिता गोरडे , समिक्षा वाबळे

Story img Loader