खोट्या व बनावट देयकांचा वापर करून व्ही. व्ही. कार्पोरेशनने सव्वा सहा कोटी रुपयांची करचोरी केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी व्ही.व्ही. कॉर्पोरेशनच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवाकर विभागाच्या अन्वेषण-२ पुणे शाखेने ही कारवाई केली आहे. व्ही. व्ही. कार्पोरेशनचे मालक प्रभाकर वेणू यांनी अस्तित्वात नसलेल्या व फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून खोटी व बनावट देयके प्राप्त करून करचोरी केल्याचे उघडकीस आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> जावयाची करामत! सासूकडून दहा लाख खंडणी उकळण्यासाठी स्वतःच्या आणि मेहुणीच्या मुलीचे अपहरण

त्यांनी सुमारे ३४ कोटी ८२ लाख रुपयांची प्रत्यक्ष मालाची खरेदी न करता खोटी व बनावट देयके घेऊन ६  कोटी २६ लाख रुपयांची करचोरी केली असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे वेणू यांना महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कायदा २०१७ मधील तरतुदीनुसार आणि अन्वेषणाच्या विशेष कार्यवाही अंतर्गत कलम १३२ (१) (क) अन्वये अटक करण्यात आली आहे. मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वस्तू व सेवाकरचे अतिरिक्त राज्यकर आयुक्त धनजंय आखाडे, राज्यकर सहआयुक्त दीपक भंडारे, राज्यकर उपायुक्त मनिषा गोपाळे-भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकर सहायक आयुक्त भारत सूर्यवंशी, सतिश लंके व सचिन सांगळे आणि राज्यकर निरीक्षकांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vv corporation owner arrested in gst fraud pune print news stj 05 zws
Show comments