पुणे : ‘शंभर दिवसात एक विकेट गेली आहे. सहा महिने थांबा आणखी एकाची विकेट जाणार आहे. त्यांचे नाव आत्ताच जाहीर करणे योग्य नाही. मात्र जो बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो. त्याची विकेट जाईल,’ असा गौप्यस्फोट खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी येथे केला.
‘बरे झाले पक्ष फुटला. जो दोन मुले असलेल्या बायकोच्या वाहनामध्ये बंदूक ठेवू शकतो. अशा फालतू माणसाबरोबर काम करणे शक्य नाही,’ अशा शब्दात सुळे यांनी धनंजड मुंडे यांच्यावर टीका केली.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या वतीने आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावा रविवारी झाला. त्यावेळी कामाचा आढावा सुळे यांनी घेतला. पुण्याचे प्रभारी आणि आमदार शशिकांत शिंदे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, युगेंद्र पवार यांच्यासह पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महायुतीच्या कारभारवर त्यांनी यावेळी जोरदार टीका केली.
‘बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या घरी एकदा भेट द्या. तिथे काय परिस्थिती आहे ते कळेल. देशमुख यांना मारहाण होत असताना त्यांना दूरध्वनी आले होेत. ही बाब मला मिळालेल्या एका माहितीतून समोर आली आहे. फोन सुरू असताना त्यांची हे गंमत पहात होते. ही खूप मोठी विकृती आहे. अवादा कंपनीला काम मिळू नये, म्हणून एका गृहस्थाने केंद्र सरकारला तीन पत्रे दिली आहेत. पत्रही त्यांनी द्यायची आणि खंडणीही त्यांची घ्यायची, असा प्रकार आहे. हाच आकाचा तोच आका आहे,’ असे सुळे यांनी सांगतानाच ‘एक वेळ विरोधात बसेन. मात्र, नैतिकता सोडणार नाही,’ असे सांगितले.
पक्षाकडून मतदारांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. हार-जीत सुरूच असते. शंभर दिवसात एक विकेट गेली आहे. सहा महिन्यात आणखी एकाची विकेट जाणार आहे. त्याचे नाव आत्ताच जाहीर करणे योग्य नाही. मात्र, तो बायकोच्या आड लपतो आणि सर्व उद्योग करतो. हिंमत असेल तर, समोर येऊन लढावे ही लढाई मोठी आहे, असे सुळे यांनी स्पष्ट केले.यची, असा प्रकार आहे. हाच आकाचा तोच आका आहे,’ असे सुळे यांनी सांगतानाच ‘एक वेळ विरोधात बसेन. मात्र, नैतिकता सोडणार नाही,’ असे सांगितले.
पक्षाकडून मतदारांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. हार-जीत सुरूच असते. शंभर दिवसात एक विकेट गेली आहे. सहा महिन्यात आणखी एकाची विकेट जाणार आहे. त्याचे नाव आत्ताच जाहीर करणे योग्य नाही. मात्र, तो बायकोच्या आड लपतो आणि सर्व उद्योग करतो. हिंमत असेल तर, समोर येऊन लढावे ही लढाई मोठी आहे, असे सुळे यांनी स्पष्ट केले.