पिंपरी-चिंचवड शहरात नुकतीच एक धक्कादायक घटना घडली. दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चऱ्होली रोडवरील हॉटेल नानाश्री अलंकापूरम येथे दोन वेटरने तिसऱ्या वेटर मित्राची किरकोळ वादातून खून केल्याची घटना घडली आहे. खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी खून केलेल्या मित्राचे शीर धडापासून वेगळे करण्यात आले. खूनाची घटना कळू नये म्हणून ते शीर हॉटेलच्या पाठीमागे फेकून देण्यात आले. तर शरीर त्याच ठिकाणी ठेऊन आरोपीने पोबारा केला. ही घटना आज सकाळी अकराच्या सुमारास समजली. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ज्ञानेश्वर अंकुश गवळी वय-२० असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून अनिकेत मानसिंग रजपूत आणि राजू सखाराम पावडे वय-१९ अशी खून केलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांवरही खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,हॉटेल नानाश्री अलंकापुरम हे चऱ्होली रोडवर आहे .येथे आरोपी आणि मयत व्यक्ती वेटर म्हणून काम करत होते. ते संपल्यानंतर रात्रीच्या वेळी हॉटेल मध्ये राहात होते. तिघांमध्ये दररोज किरकोळ कारणांवरून खटके उडायचे. मध्यरात्री हॉटेल बंद केल्यानंतर मालक घरी निघून गेले. त्यानंतर तिघे जण जेवत होते, त्याचवेळी पुन्हा तिघांमध्ये किरकोळ वाद झाला. जेवणाआधी त्यांनी दारू प्यायली होती. याच नशेत आरोपी अनिकेत मानसिंग रजपूत आणि राजू सखाराम पावडे यांनी ज्ञानेश्वरच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारले यात ज्ञानेश्वरचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी घाबरून गेले त्यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मयत ज्ञानेश्वरचे शीर धडापासून वेगळे केले ते हॉटलच्या पाठीमागे फेकून देण्यात आले.