लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) अभियांत्रिकी, व्यवस्थापनशास्त्र अशा प्रमुख अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अजून सुरू केलेली नाही. प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार या बाबत नेमकी स्पष्टता नसल्याने पालक आणि विद्यार्थी संभ्रमात आहेत. दरम्यान, आठवड्याभरात प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती सीईटी सेलचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी दिली.

schedule for postgraduate medical admissions announced after changing eligibility criteria
पात्रता निकष बदलल्यानंतर वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Beed Sarpanch Murder Case Prime Accused Valmik Karad Cast
अग्रलेख : कूच बिहार!
MPSC Preparation Group B Services Prelims Exam History of Modern India
एमपीएससी तयारी: गट ब सेवा पूर्व परीक्षा; आधुनिक भारताचा इतिहास
rte registration process starting from Tuesday January 14
आरटीई प्रवेशांसाठी अर्ज प्रक्रिया उद्यापासून, किती जागा उपलब्ध?
upsc exam preparation tips,
यूपीएससीची तयारी : सीसॅट पेपर
AIIMS Recruitment 2025
AIIMS Recruitment 2025 : एम्समध्ये २२० पदांची भरती सुरू, MBBS व BDS उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; जाणून घ्या, कसा करावा अर्ज?
MPAC Mantra Intelligence Test and Arithmetic Group B Non Gazetted Services Pre Exam sports news
एमपीएसी मंत्र: बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित; गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा

सीईटी सेलने नर्सिंग सीईटी वगळता विविध अभ्यासक्रमांसाठी घेण्यात आलेल्या सर्व सीईटी परीक्षांचा निकाल जाहीर केला. त्यानंतर सीईटी सेलने, अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत नोंदणी करण्याचे वेळापत्रकही प्रसिद्ध केले होते. त्यानुसार १५ जूनपासून अभियांत्रिकी, कृषि, औषधनिर्माणशास्त्र, विधी, शिक्षणशास्त्र, शारीरिक शिक्षणशास्त्र अशा अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया १५ जूनपासून सुरू होणार होती. त्यानुसार बीए- बीएस्सी बीएड आणि विधी (पाच वर्षे) या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियांची नोंदणी सुरू झाली आहे. बीएड अभ्यासक्रम, विधी (तीन वर्षे) अभ्यासक्रम नोंदणी प्रक्रिया २३ जूनपासून सुरू होणार आहे. तर, इतर अभ्यासक्रमांच्या नोंदणीची प्रतीक्षाच करावी लागत आहे.

आणखी वाचा-पुणे: गुणवत्ता, अध्ययन वाढीसाठी ३५ लाख शिक्षकांना प्रशिक्षण

सीईटी सेलने जाहीर केलेल्या अभ्यासक्रमानुसार अनेक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे पालक विद्यार्थी संभ्रमात आहेत. प्रवेश प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी https://cetcell.mahacet.org/ या संकेतस्थळावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Story img Loader