पिंपरी : साहित्य घरपोच करण्यासाठी (डिलिव्हरी) गृहनिर्माण सोसायटीमध्ये गेल्यानंतर पाळत ठेवून सायकली चोरून ‘ओएलएक्स’ अँपवर जाहिरात देऊन विक्री करणाऱ्या डिलिव्हरी बॉयला वाकड पोलिसांनी अटक केली.राहुल रविंद्र पवार (वय २५, रा. काळेवाडी) असे अटक केलेल्या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. याबाबत संदीप दिगंबर तांबे (वय ४३, रा.रहाटनी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

आरोपी राहुल हा साहित्य घरपोच करण्याचे काम करतो. साहित्य देण्याच्या बहाण्याने तो सोसायटीमध्ये जायचा आणि सायकलीवर पाळत ठेवत होता. वेळ मिळाल्यानंतर तो सायकली चोरत होता. ‘ओएलएक्स’ अँपवर जाहिरात देवून लोकांना विकत होता. आरोपी राहुल चोरीची सायकल विकण्यासाठी तापकीर मळा येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ८५ हजार रुपये किंमतीच्या सहा महागड्या सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

three suspect arrested in attempted kidnapping school boy
उमराळ्यात शाळकरी मुलास पळविण्याचा प्रयत्न; तीन संशयितांना अटक
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Nagpur, suicide , police station,
नागपूर : खळबळजनक! पोलीस ठाण्यात आरोपीने चाकू स्वत:च्या पोटात…
Nagpur Police seized Rs 3 crore worth of stolen goods returning them to complainants
“तुमच्या घरातून चोरी झालेले दागिने सापडले…” पोलिसांनी ३ कोटींचा मुद्देमाल…
15 year old accused stealed Rs 32 000 and mobile from 80 year old man
गांजा बाळगणाऱ्या दोघांना पकडले
Ganja was sold from paan stall in Wakad Police arrested man
वाकडमध्ये पान टपरीतून विकला जात होता गांजा; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Bharosa Cell Unit mother and son
‘मॅडम…  माझ्या हृदयातून मुलगा हरवला हो… मला शोधून द्या…’
Image of a person in handcuffs or a liquor shop
पठ्ठ्याला मोहच आवरला नाही! चोरीसाठी दारूच्या दुकानात घुसला चोर अन् अति प्यायल्याने तिथेच झाला आडवा
Story img Loader