गणपतीची वर्गणी न दिल्याच्या रागातून दहा जणांच्या टोळक्याने लाकडी दांडके आणि लोखंडी पाईपने आई आणि मुलाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सागर घडसिंगसह दहा जनांविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश देवराम चौधरी (वय-३७) यांनी वाकड पोलिसात फिर्याद नोंदवली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सागर हा वाकड परिसरातील सदगुरू कॉलनीत राहतो. तर फिर्यादी यांचे त्याच परिसरात माताजी कलेक्शन नावाचे कपड्याचे दुकान आहे. कॉलनीत ओम साई गणपती मंडळ असून त्याची ५ हजार वर्गणी का देत नाहीत म्हणून मध्यरात्री आरोपीने फिर्यादी यांच्या बंद दुकानाची जाळी जोरजोरात वाजवत होता. तेव्हा, फिर्यादी आणि जखमी भाऊ मुकेश चौधरी, आई जमनीबाई चौधरी हे त्याला विरोध करत होते.

सागरने दहा जणांचे टोळके बोलावले त्यांच्या हातात लाकडी दांडके होते. तर सागर च्या हातात लोखंडी पाईप होता, तुम्ही आम्हाला वर्गणी का देत नाही थांब तुला जीवे ठार मारतो असे म्हणून लोखंडी पाईप ने फिर्यादी यांचा भाऊ मुकेशच्या डोक्यात मारला यात ते गंभीर जखमी झाले आहेत. तर इतर टोळक्याने लाकडी दांडक्याने आईला आणि फिर्यादी यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.

Story img Loader