बीड मधील खंडणी प्रकरणातील आरोपी असलेल्या वाल्मिक कराडचं पिंपरी-चिंचवड कनेक्शन असल्याचं उघड झालं आहे. वाकडमधील पार्क स्टेट येथे कोट्यावधीचा फ्लॅट असल्याचं उघड झालं आहे. वाल्मिक कराड आणि त्याच्या पत्नीच्या नावावर सहाव्या मजल्यावर ६०१ फ्लॅट नंबरचा हा फ्लॅट आहे. सुमारे एक लाख रुपयांचा मालमत्ता कर थकवल्याप्रकरणी वाल्मिक कराडच्या फ्लॅटच्या दरवाज्यावर कर संकलन विभागाकडून नोटीस लावण्यात आली आहे. कराडने थकबाकी न भरल्यास महानगरपालिका पुढे नेमकी काय कारवाई करत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे ही वाचा… कर्मचाऱ्यांच्या ताणावर ॲपची मात्रा ! पुणे महापालिका प्रशासनाचा स्थायी समितीसमोर प्रस्ताव

Walmik Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर ३०२ चा गुन्हा दाखल होणार का? विचारताच पोलीस अधीक्षकांचं उत्तर; म्हणाले, “मी…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
emergency qr code on vehicles loksatta
नागपूर : अपघातग्रस्ताची ओळख करून देणार ‘क्यू आर कोड’, तात्काळ उपचारासाठी…
pune municipal corporation will take action against banners
पिंपरी : फलकांद्वारे शहर विद्रूप केल्यास आता दंडात्मक कारवाई, महापालिका आयुक्तांचा आदेश; प्रभागनिहाय नागरिकांची समिती
Police Commissioner issues stern warning to goons Pune news
पोलीस आयुक्तांकडून गुंडांना कडक इशारा; ‘कायदा पाळा, अन्यथा शहर सोडून जा’
Kalyan Dombivli municipal limits, illegal buildings in Kalyan Dombivli ,
कडोंमपामधील ५८ बेकायदा इमारतींना तूर्त दिलासा, महापालिकेच्या तोडकाम कारवाईला उच्च न्यायालयाची तूर्त अंतरिम स्थगिती
police employee threatened and extorted shopkeepers in Azad Maidan area
वैमनस्यातून तिघांवर कोयत्याने वार, कासेवाडीतील घटना; सराइतांविरुद्ध गुन्हा
house burglar Incidents Balewadi, Sinhagad road area pune
घरफोडीत साडेआठ लाखांचा ऐवज चोरीला; बालेवाडी, सिंहगड रस्ता परिसरातील घटना

हे ही वाचा… पुणे शहरात आता रात्रीही होणार कचरासंकलन, हे आहे कारण ?

दरम्यान मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटाच्या सहभागात संशयित म्हणून वाल्मिककराडवर मंगळवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमान्वये (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर परळीत मात्र आंदोलन सुरू झाले असून कराड समर्थकांनी परळी बंदची हाक दिली. बीड शहर पोलीस ठाण्याबाहेर वाल्मिक कराड समर्थकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. वाल्मिक कराडची ७५ वर्षांची आई आणि पत्नीही या ठिय्या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.

Story img Loader