पुणे: पुण्यातील वानवडी भागात राहणार्या एका महिलेचे मॉर्फ केलेले न्यूड फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल करण्याची धमकी देऊन दोन हजार रूपयांची खंडणी मागणाऱ्या १९ वर्षीय आरोपीला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. रघुवर बलराम चौधरी (वय १९ रा.शिंदे वस्ती हडपसर मूळचा उत्तर प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी भागात राहणार्या एका महिलेच्या नावाने इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर आरोपी रघुवर बलराम चौधरी याने एक बनावट अकाऊंट तयार केले.तुम्ही जर मला दोन हजार रुपये दिले नाही.तर मी तुमचे मॉर्फ केलेले न्यूड फोटो व्हायरल करेल,अशी धमकी मेसेजद्वारे पीडित महिलेला आरोपी रघुवर चौधरी याने दिली.या धमकीकडे पीडित महिलेने दुर्लक्ष केले,त्यावर आरोपी रघुवर चौधरी याने पीडित महिलेच्या भावाच्या अकाउंटवर महिलेचे मॉर्फ केलेले फोटो पाठवले.जर आणखी फोटो पाठवयाचे नसेल तर पैसे द्या,तरच फोटो आणि इन्स्टाग्रामवरील आयडी देखील डिलीट करेल अशी धमकी आरोपी रघुवर चौधरी याने पीडित महिलेले दिली.
त्यानंतर अखेर पीडित महिलेने आमच्याकडे तक्रार देताच,आरोपी रघुवर बलराम चौधरी याला ताब्यात घेऊन तांत्रिक विश्लेषणामध्ये गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून त्या आरोपीकडे अधिक चौकशी करण्यात येत असल्याचे वानवडी पोलिसांनी सांगितले.