लोणावळ्यातील धबधब्यात वाहून जात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने लोणावळ्यातील पर्यटन स्थळाची सीमा आखली आहे. लोणावळ्यातील भुशी धरण, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट या ठिकाणी जाण्यासाठी वेळेचे बंधन घालण्यात आल आहे. सकाळी सहा ते संध्याकाळी सहाच्या दरम्यानच पर्यटकांना तिथे जाण्याची मुभा आहे. पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. जिल्ह्याधिकारी यांच्या या निर्णयाचे पर्यटकांनी स्वागत केलं आहे. त्यांचा हा निर्णय योग्य असल्याचं पर्यटकांनी म्हटलं आहे.
हेही वाचा – बीबीए, बीसीए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार?
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांना धक्का; आणखी दोन पदाधिकारी शरद पवार गटात
सायंकाळी सहाच्या नंतर पर्यटक भुशी धरण, लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट या ठिकाणी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती लोणावळा नगर परिषदेचे सीईओ अशोक साबळे यांनी दिले आहे. हे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे यात कुठलीही सूट मिळणार नाही. लोणावळ्यातील अशे काही पॉईंट आहेत जिथं पर्यटकांना जाण्यास आधीपासूनच बंदी आहे. परंतु, त्या नियमांचे उल्लंघन करून पर्यटक हे बिनधास्तपणे त्या ठिकाणी जातात. अशावेळी देखील आता पर्यटकांवर कारवाई केली जाणार आहे. ज्या धबधब्यात पाच जणांचा वाहून मृत्यू झाला त्या रेल्वेच्या वॉटर फॉल ठिकाणी जाण्यास बंदी होती हे समोर आलेल आहे. त्यामुळे प्रशासनाने कठोर पावलं उचलत आता ॲक्शन प्लॅन केला आहे. पर्यटकांना वेळेचे बंधन घातले आहे. महाराष्ट्रातील पुणे, मुंबईसह, परराज्यातील पर्यटकांनी यातून धडा घेण्याची गरज आहे. स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेऊन लोणावळ्यात पर्यटन करावं.