मोटारींच्या काचा फोडून लॅपटाॅप, तसेच मौल्यवान ऐवज चोरणाऱ्या हरियाणातील चोरट्यासह साथीदाराला गुन्हे शाखेने पकडले. चोरट्यांकडून ४१ गुन्हे उघडकीस आले असून ८ लाख ३५ हजार रुपयांचे १६ लॅपटाॅप जप्त करण्यात आले आहेत.

हेही वाचा >>>भरधाव बसच्या धडकेने पादचारी मृत्युमुखी; नगर रस्त्यावर अपघात

Gujarat gold chain snatchers thieves active in vasai
गुजरातमधील सोनसाखळी चोर वसईत सक्रीय, गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून अटक
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Hinjewadi police has arrested a thief who stole a two wheeler
आयटी हब हिंजवडीत दुचाकी चोरणारा चोरटा जेरबंद; 10 दुचाकी पोलिसांनी केल्या जप्त, कमी किमतीत दुचाकी विकत असे
On Arni Road in Yavatmal near Krishi Nagar speeding car driver ran over pedestrians two wheeler riders and handcarts
यवतमाळ हिट अँड रन प्रकरण, कारने भाजी विक्रेते व दुचाकीस्वारांना उडविले
speeding luxury car collide straight into grade
भरधाव अलीशान कार थेट गॅरेजमध्‍ये घुसली; तिघे गंभीर जखमी, अलिबाग चोंढी येथील घटना
drunk driver injures woman police officer at checkpost
नाकाबंदीत मोटारचालकाने महिला पोलीस हवालदाराला फरफटत नेले
Thief arrested, Thief arrested for stealing in Mumbai,
साधकाच्या वेशात चोरी करणारा चोरटा गजाआड; पुणे, पिंपरीसह मुंबईत वाईत चोरीचे गुन्हे
villagers rescue accused as well as cop falls into well In sangamner taluka
पुढे आरोपी, मागे पोलीस पाठलागाचा थरार ! आरोपी पाठोपाठ पोलीसही पडला विहिरीत

विकी धरमपाल ठाकूर (वय ३४, सध्या रा. बालेवाडी, मूळ रा. सच्चाखेडा, हरियाणा), सुशीलकुमार उर्फ बिंदू (रा. दिल्ली) यांना अटक करण्यात आली आहे. ठाकूर केशकर्तनालयात कारागीर आहे. ठाकूर आणि साथीदार बिंदू याने शहरातील वेगवेगळ्या भागात मोटारींच्या काचा फोडून लॅपटाॅप; तसेच मौल्यवान ऐवज लांबविला होता. गेल्या काही महिन्यांपासून शहरात मोटारींच्या काचा फोडून लॅपटाॅप लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. गुन्हे शाखेच्या पथकाकडून चोरट्यांचा माग काढण्यात येत होता. गणेशखिंड रस्त्यावर चोरटे थांबल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाला मिळाली. एक जण कमी किंमतीत लॅपटाॅप विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा लावून ठाकूर आणि साथाीदारास ताब्यात घेतले.

हेही वाचा >>>पुणे: जिल्ह्यातील सीएनजी पंप चालकांचा संप पुढे ढकलला

अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक निरीक्षक विकास जाधव, जयदीप पाटील, महेंद्र पवार, अजय गायकवाड, हरिश मोरे, सारस साळवी आदींनी ही कारवाई केली.

चोरी करण्यासाठी विमानाने पुण्यात
आरोपी ठाकूर आणि साथीदार चोरी करण्यासाठी दिल्लीहून विमानाने पुण्यात यायचे. चोरी केल्यानंतर पिशवीतील कागदपत्रे नदीत फेकून द्यायचे. लॅपटाॅप, मौल्यवान ऐवजाची स्वस्तात विक्री करुन आरोपी विमानाने दिल्लीला पसार व्हायचे.

Story img Loader