पुणे : ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकून नेमबाज स्वप्नील कुसळे आज मायदेशी परतला. आज सकाळी पुण्यात आगमन झाल्यावर पुणेकरानी त्याचे उत्स्फूर्त स्वागत केले. शहरातील दगडूशेठ गणपती मंदीरात आरती केल्यानंतर क्रीडा संकुलात प्रवेश करण्यापूर्वी त्याची उघड्या जीपमधून मिरवणूक काढण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विमानतळावर गर्दी केलेल्या पुणेकरांच्या स्वागताचा स्विकार केल्यानंतर स्वप्नीलने पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदीरात बाप्पाची आरती केली. त्यापूर्वी विमानतळावर क्रीडा सहसंचालक सुहास पाटील उपसंचालक सुधीर मोरे यांच्या हस्ते स्वप्नीलचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. विमानतळावर फार वेळ न घेणाऱ्या स्वप्नीलने दगडूशेठ मंदीरात आरती केल्यावर माध्यमांशी अल्पशा संवाद साधला. बाप्पामुळेच हे सर्व शक्य झाले. त्यामुळेच घरी कोल्हापूरला जाण्यापूर्वी बाप्पाला भेटायला आलो. आजपर्यंत जे मागितले, ते बाप्पाने दिले आहे, असे स्वप्निल म्हणाला.

हे ही वाचा… पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्राँझपदक मिळविलेल्या महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळे याने घेतले दगडूशेठ गणपतीचं दर्शन

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत स्वप्निलने आव्हानात्मक अशा रायफल थ्री-पोझिशन प्रकारात भारताला कांस्यपदक मिळवून दिले. ऑलिम्पिक स्पर्धेत १५२मध्ये खाशाबा जाधव यांच्यानंतर वैयक्तिक पदक मिळविणारा स्वप्नील दुसराच भारतीय खेळाडू ठरला.

दगडूशेठ गणपती मंदीरात आरती केल्यानंतर स्वप्नील आपल्या कर्मभूमीत म्हणजे म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात दाकल झाला. तेव्हा संकुला जवळील चौकातून उघड्या जीपमधून वाजत गाजत त्याची मिरवणूक काढण्यात आली. या वेळी स्वप्नीलला पाहण्यासाठी रस्त्याच्या बाजूने चांगली गर्दी केली होती. चाहत्यांच्या गर्दीतून मिरवणूकीतून मार्ग काढत स्वप्नील आपल्या कर्मभूमीत दाखल झाला. या वेळी जीपमध्ये त्याच्यासोबत प्रशिक्षिका दिपाली देशपांडे, आंतरराष्ट्रीय पंच आणि संकुलातील गन फॉर ग्लोरीचे संचालक पवन सिंग उपस्थित होते.

पदकासह स्वप्नीलची छबी कॅमेऱ्यात टिपण्यासाठी गर्दीतून अनेक मोबाईल बाहेर आले होते. काही उस्फूर्त चाहते तर चालत्या गाडीसमोर खाली उभे राहून सेल्फी काढण्यातही धन्यता मानत होते.