पिंपरी : देशातील १५ विरोधी पक्षांची बिहारमधील पाटण्यात बैठक झाली. त्यांचा अजेंडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरवायचा आहे. पण, लालूप्रसाद यादव हे राहुल गांधी यांना म्हणाले लग्न करा आम्हाला तुमच्या वरातीत नाचायचे आहे. त्यामुळे ही बैठक लग्न जमवायला केली होती की मोदी यांना हरविण्यासाठी होती? बैठकीत काही गांभीर्य होते की नव्हते, असा हल्लाबोल केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. अमेरिकेकडून भारताच्या लोकशाहीचे कौतुक केले जाते. पण, काँग्रेस नेते राहुल गांधी हे परदेशात जाऊन भारताची लोकशाही धोक्यात आल्याचे सांगतात असेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आळंदीत बोलताना दानवे म्हणाले, सर्व विरोधक भाजपाला जातीवादी म्हणतात. पण, शरद पवार यांनी आमच्यासोबत निवडणूक लढविली होती. भाजपाच्या केंद्रातील सरकारमध्ये नितीश कुमार, ममता बॅनर्जी हे रेल्वे मंत्री होते. मायावती भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाल्या होत्या. फारूक अब्दुल्ला हे आमच्या सरकारसोबत होते. तेव्हा आम्ही जातीवादी नव्हतो का, या सर्वांची तोंडे खरकटी आहेत. त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हे जनतेला सांगावे. मोदी सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. ते पंतप्रधान झाल्याचे विरोधकांना पचनी पडत नाही. देश मजबूत माणसाच्या हातात आहे. त्यामुळे देशाची परिस्थिती चांगली आहे. हे गावातील लोकांना सांगावे.

हेही वाचा – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले, “तोपर्यंत शिरूरमध्ये कितीही मंत्री आले तरी..”

२०१४ ते २०१९ दरम्यान केलेल्या कामगिरीमुळे जनतेने पुन्हा केंद्रात भाजपाला निवडून दिले. करोना भारतात येण्यापूर्वी केंद्र सरकारने उपाययोजना केली होती. भारताची लोकसंख्या जास्त असतानाही मृत्यूचे प्रमाण कमी राहिले. कारण, करोना परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकारला यश आले. कोरोनाची लस भारताने तयार केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची उंची वाढविली. जगाच्या पाठीवर एवढी पत कधीही नव्हती. वाहिन्यांवर मोदी यांच्याशिवाय कोणतीही बातमी नाही. चार दिवसांपासून त्यांच्या दौऱ्याच्या बातम्या आहेत. यापूर्वीच्या पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या बातम्या येत नव्हत्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात भारताची लोकशाही चांगली आहे आणि राहुल गांधी परदेशात जाऊन भारताची लोकशाही धोक्यात आल्याचे सांगतात, असेही ते म्हणाले.