लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: पुणे शहरासाठी वर्षाला ११ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी मंजूर आहे. मात्र, प्रत्यक्षात महापालिका २० टीएमसी पाणी वापरते. तब्बल चार टीएमसी पाण्याची जलवाहिन्यांतून गळती होते. म्हणजेच शहराला चार महिने पुरेल, एवढे पाणी सदोष वितरण प्रणालीमुळे वाया जाते, असे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील स्पष्ट केले.
       
शहरातील विविध प्रकल्पांचे उदघाटन केल्यानंतर पालकमंत्री पाटील बोलत होते. ते म्हणाले, की पुण्याच्या पाणी वितरणात मोठ्या प्रमाणात गळती असल्याने समान पाणीपुरवठा योजना आणली आहे. या योजनेंतर्गत ८५ टाक्यांचे नियोजन असून त्यापैकी ६० टाक्या पूर्ण झाल्या आहेत. जायका प्रकल्पांतर्गत ११ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) झाल्यानंतर यातून पुनर्वापर केलेले पाणी उद्योगांना देऊन उद्योगांचे पाणी शहरासाठी घेण्यात येणार आहे. याबाबत चाकण एमआयडीसी सोबत बोलणी झाली असून रांजणगाव एमआयडीसी सोबत बोलणी सुरू आहेत. यापुढे उद्योगांना धरणातील पाणी न देता पुनर्वापर केलेले पाणीच देणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी या वेळी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water leak that would be enough for pune residents for four months pune print news psg 17 mrj
Show comments