पुणे : मुसळधारांमुळे शहरातील वेगवेगळ्या भागात २५ ठिकाणी पाणी शिरण्याच्या घटना घडल्या. रविवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे दहा ठिकाणी झाडे पडली; तसेच दोन ठिकाणी भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या घटनेत जीवीतहानी झाली नाही. शहरात रविवारी (११ सप्टेंबर) सायंकाळी झालेल्या  पावसामुळे पाणी शिरण्याच्या घटना घडल्या. आंबीलओढा परिसरातील वसाहतीत पाणी शिरले. हडपसर, आंबीलओढा वसाहत, चंदननगर भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साठले होते. चंदननगर पोलीस ठाणे तसेच जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व पोलीस चौकीत गुडघाभर पाणी साठले होते. मध्यरात्रीपर्यंत अग्निशमन दलाचे जवान मदतकार्य करत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा <<< Maharashtra News Live : दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट

हेही वाचा <<< अपुऱ्या सोयीसुविधांच्या निषेधार्थ पिंपरीत रहिवाशांचे आंदोलन

हडपसर गाडीतळ भागात एका घरात पाणी शिरले. घरातून तीन महिलांची सुटका करण्यात आली. घोरपडी गाव परिसरातील एका घरात पाणी शिरल्यानंतर पाण्यात अडकलेल्या ज्येष्ठ महिलेची सुटका करण्यात आली. मुसळधार पावसामुळे शहरात २५ ठिकाणी पाणी साठण्याची घटनांची नोंद करण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली. मध्यरात्रीपर्यंत शहराच्या वेगवेगळ्या भागात २५ ठिकाणी झाडे पडली. सोमवारी सकाळी पाषाण रस्त्यावरील पंचवटी भागात एका मोटारीवर झाड कोसळले. जवानांनी वेगवेगळ्या भागात झाडे पडल्यानंतर मदतकार्य केले. झाडांच्या फांद्या बाजूला काढून रस्ते वाहतुकीस खुले करण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water places heavy rains incidents wall collapse two places pune print news ysh
Show comments