पुणे : अनंत चतुर्दशीनिमित्त गणपती विसर्जनासाठी  सकाळी ११ वाजल्यापासून खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रामध्ये ४७०८ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. विशेष म्हणजे जलसंपदा विभागाने काल (१६ सप्टेंबर) गणेश विसर्जनासाठी पाणी सोडण्याचे नियोजन नसल्याचे स्पष्ट केले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> आगामी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढविली जाणार; उपमुख्यमंत्री अजित पवार

दरवर्षी गणेश विसर्जनासाठी खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यात येते. त्यानुसार सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती श्रींचे विसर्जन नदीत करण्यात येते. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांत मिळून एकूण पाणीसाठा २९.१५ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच १०० टक्के झाला आहे. चारही धरणांत समाधानकारक पाणीसाठा झालेला असतानाही गणेश विसर्जनासाठी यंदा पाणी सोडण्यात येणार नसल्याचे सोमवारी सांगण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी झाला असल्याने पाणी सोडण्यात आले नव्हते. दरम्यान, मंगळवारी सकाळी गणेश विसर्जनासाठी धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सकाळी ११ वाजल्यापासून ४७०८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water release from khadakwasla dam for ganesh immersion pune print news psg 17 zws