पुणे : शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील खडकवासला हे धरण १०० टक्के भरल्याने या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मोसमी पाऊस सक्रिय झाल्यापासून गेल्या सहा वर्षांत खडकवासला धरण हे ११ जुलै रोजीच पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात गेल्या सहा वर्षातील लवकर पाण्याचा विसर्ग यंदा करण्यात आला आहे.

यंदा मोसमी पाऊस सक्रीय झाल्यापासून संपूर्ण जून महिन्यात पावसाने पाठ फिरवली. तसेच यंदा पूर्वमोसमी पावसानेही धरणांच्या परिसरात हजेरी लावली नाही. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठला होता. या पार्श्वभूमीवर पुणे शहरात पाणीकपात करण्याची वेळ आली आणि ४ जुलैपासून पाणीकपातीच्या निर्णयाची अंमलबजावणी देखील सुरू करण्यात आली. मात्र, त्यानंतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू झालेला मुसळधार पाऊस अद्यापही कायम आहे. परिणामी खडकवासला हे धरण यंदा ११ जुलै रोजीच पूर्ण क्षमतेने भरले, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

Sandy Irvine 100 years later
Sandy Irvine remains found:एव्हरेस्ट १९२४ सालीच सर झाला होता का? अर्विनचे सापडलेले अवशेष नेमकं काय सांगतात?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Thirumayam Fort
‘या’ किल्ल्यावरील अंडाकृती खडकाखाली दडलंय काय?
sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
Maharashtra rain updates
Maharashtra Rain News: दक्षिण महाराष्ट्राला बिगर मोसमी पावसाचा फटका, आणखी दोन दिवस पावसाचा जोर
Sindhudurg rain
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची हजेरी, बागायतदार चिंतेत
India Meteorological Department has warned a rain alert for 15 districts of Maharashtra state
‘या’ १५ जिल्ह्यांना १५ नोव्हेंबरला सतर्कतेचा इशारा !

खडकवासला धरणातून केलेल्या विसर्गाचा आढावा

पाऊस सुरू झाल्यानंतर यंदा हंगामात प्रथमच ११ जुलै रोजी खडकवासला धरण प्रथम भरले. सन २०२१ मध्ये २२ जुलै रोजी खडकवासला धरण १०० टक्के भरले आणि या धरणातून २४६६ क्युसेक वेगाने मुठा नदीत पाणी सोडण्यात आले. सन २०२० मध्ये हे धरण १३ ऑगस्ट रोजी १०० टक्के भरले आणि मुठा नदीत १७१२ क्युसेकने पाणी सोडण्यात आले. सन २०१९ मध्ये खडकवासला धरण ११ जुलै रोजी १०० टक्के भरले आणि १७१२ क्युसेकने पाणी नदीत सोडण्यात आले. सन २०१८ मध्ये १६ जुलैला हे धरण १०० टक्के भरले आणि नदीपात्रात १७१० क्युसेकने पाणी सोडण्यात आले, तर सन २०१७ मध्ये २४ जुलै रोजी खडकवासला धरण प्रथम भरले आणि ५१३६ क्युसेकने या धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यात आले.

खडकवासला धरणाची विसर्ग क्षमता

खडकवासला धरणातून पाणी विसर्ग करण्याची क्षमता ९८ हजार ७६६ क्युसेकची आहे. मात्र, शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव आणि पानशेत या तीन धरणांमधून खडकवासला धरणात पाण्याचा विसर्ग केला जातो, त्यानंतर खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडले जाते. त्यामुळे खडकवासला धरणातून विसर्ग क्षमतेपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग करता येऊ शकतो, असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले.

खडकवासला धरणातून आतापर्यंतचा सर्वाधिक पाण्याचा विसर्ग

वर्ष             पाण्याचा विसर्ग (क्युसेकमध्ये)

१९४३       ८० हजार ७६६

१९५४       एक लाख पाच हजार १४०

१९५८        एक लाख १३ हजार ३९२

१९८३         ८६ हजार ४९०